Old Pension योजनेवर नाना म्हणाले, ‘आपण सरकार, चावी आपल्याजवळ, आता ती कशी फिरवायची ठरवा’

Nana Patole on Old Pension Scheme : अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 2003 मध्ये जुनी निवृत्ती योजना बंद केली होती आणि सत्तेतून बाहेर होण्यापूर्वी एक महिना अगोदर 1 एप्रिल 2004 रोजी त्यांनी सध्यस्थितीत असलेली राष्ट्रीय पेन्शन योजना सुरु केली होती.

Old Pension योजनेवर नाना म्हणाले, 'आपण सरकार, चावी आपल्याजवळ, आता ती कशी फिरवायची ठरवा'
जुन्या पेन्शन योजनेवर बोलताना नाना पटोलेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 8:07 PM

मुंबई : विधानसभेचं अर्थसंकल्पीय (Assembly Budget Session 2022) अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात 15 मार्च रोजी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा छेडला गेला. यावेळी काँग्रेस आमदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. जुन्या पेन्शन योजनेला (Old Pension Scheme) पुन्हा सुरु केलं जावं, ही मागणी काँग्रेसनं केली आहे. हाच विषय नाना पटोले यांनी सोमवारी सभागृहामध्ये मांडला. यावेळी बोलताना त्यांनी सरकार आपलं आहे, चावी आपल्याजवळ आहे, आता जावी कशी फिरवायची हे आपण ठरवायचं, असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय. जुन्या पेन्शनला लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळायला हवी, अशी आग्रही भूमिका त्यांनी यावेळी मांडली. यावेळी नाना पटोले यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. ते सोमवारी सभागृहात बोलत होते. आज नाना पटोले यांनी ट्वीट करत याविषयावर पुन्हा सगळ्यांचं लक्ष वेधलंय.

काय म्हणाले नाना पटोले?

सोमवारी विधानसभेत बोलताना नाना पेटोले यांनी जुन्या पेन्शनला पुन्हा लागू करण्याचा मुद्दा मांडत म्हटलंय की,…

छत्तीसगड राज्यस्थानच्या सरकारनं जुनी पेन्शन योजना आहे, तिला रेग्यूलर करण्याचं काम केलंय. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात, एकीकडे राज्यातील कर्मचाऱ्यांकडून आपण काम करुन घेतो, पण पेन्शनच्या विषयावर आपण मागे पडतोय. जुनी पेन्शन योजना आपण पुन्हा लागू करावी, अशी मागणी मी करतो आहे. याबाबत आपण विचार करावा. आपण सरकार आहे, चावी आपल्याजवळ आहे. आता चावी कशी फिरवायची, हे आपण ठरवा.

जुन्या पेन्शन योजनेत काय आहे?

जुन्या पेन्शन योजने आणि नव्या योजनेत मूलभूत फरक आहे. जुनी निवृत्ती योजनेत सरकार आणि कर्मचा-यांचे पेन्शन फंडातील योगदान एकसारखे असतं. त्याचप्रमाणे जर नियमांचा विचार केला तर जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीवेळी जे अंतिम वेतन मिळते, त्याच्या 50 टक्के भाग हा निवृत्ती योजनेत मिळतो. नवीन निवृत्ती योजनेत हा नियम लागू करण्यात आलेला नाही. कारण नवीन योजनेत निश्चित स्वरुपाचा परतावा देण्यासंबंधीचा नियम लागू करण्यात आलेला नाही.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 2003 मध्ये जुनी निवृत्ती योजना बंद केली होती आणि सत्तेतून बाहेर होण्यापूर्वी एक महिना अगोदर 1 एप्रिल 2004 रोजी त्यांनी सध्यस्थितीत असलेली राष्ट्रीय पेन्शन योजना सुरु केली होती. विविध विभागातील आणि विविध क्षेत्रातील कर्मचा-यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी केली आहे. तर नवीन योजना बंद करण्याची मागणी केली आहे.

आता काँग्रेसही जुन्या पेन्शन योजनेला पुन्हा लागू करण्याबाबत आग्रही आहे. नुकतीच राज्यस्थान आणि छत्तीसगड या राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पद्धतीप्रमाणे निवृत्ती वेतन मिळू शकणार आहे. हा लाभ राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मिळावा, या मागणीसाठी काँग्रेसनेही जुन्या पेन्शन योजनेबाबत आग्रही भूमिका घेतली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

जुनी की नवी पेन्शन योजना लागू होणार? जाणून घ्या अर्थ राज्यमंत्री काय म्हणाले

सरकारी कार्यालयात Mobile वापरावर बंदी येणार? मद्रास हायकोर्टात मोबाईलच्या वापरावर महत्त्वपूर्ण सुनावणी

Health Insurance Portability : आरोग्य विमा योजनेला करा पोर्ट, या बाबी ठेवा लक्षात..!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.