Eknath Shinde Video : ‘सगळे अगदी आनंदात आहेत’ हॉटेलबाहेर येऊन असं बोलण्याची वेळ शिंदेंवर का आली?

आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेला पुढे नेत आहोत. यात शंका नसावी, बंडखोर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला गेले आहेत. ही सत्तास्थापनेची तयारी तर नाही ना, मग अचनाक फडणवीस दिल्लीला का गेले, शिंदेंची अचानक शिवसेनेच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया कशी आली, असे अनेक प्रश्न राजकारणात केंद्रस्थानी आहेत.

Eknath Shinde Video : 'सगळे अगदी आनंदात आहेत' हॉटेलबाहेर येऊन असं बोलण्याची वेळ शिंदेंवर का आली?
शिंदे विरुद्ध ठाकरे?Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 3:09 PM

गुवाहाटी : आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेला (Ekanth Shinde) पुढे नेत आहोत. यात शंका नसावी, सगळं काही आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया बंडखोर एकनाथ शिंदेंनी यांनी गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर येऊन दिली आणि चर्चाला उधाण आलंय. शिवसेनेवर नाराज असलेले एकनाथ शिंदे असं अचानक का म्हणाले? याबाबत आता प्रश्न उपस्थितीत होऊ लागले आहेत. यामुळे शिंदे गटात सर्वकाही अलबेल आहे ना, की भाजप (BJP) दुसऱ्या पर्यायाचा विचार करतोय, अशा शक्यता देखील राजकारणातील जाणकार व्यक्त करतायत. राज्यात सध्या राजकीय  घडामोडींना (Maharashtra Political Crisis) वेग आला असून विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला गेले आहेत. ही सत्तास्थापनेची तयारी तर नाही ना, मग अचनाक फडणवीस दिल्लीला का गेले, शिंदेंची अचानक शिवसेनेच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया कशी आली, असे अनेक प्रश्न राजकारणात केंद्रस्थानी आहेत.

6 दिवसानंतर शिंदे हॉटेलबाहेर

शिंदेंच्या वक्तव्याच्या काही शक्यता

  1. शिंदे गटातील आमदारांची चिंता-   शिंदे गटातील काही आमदार पुन्हा शिवसेनेत जाऊ शकतात. अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. कारण, यापूर्वी देखील शेवटी -शेवटी शिंदे गटात गेलेले आमदार हे शिवसेनेनं पाठवले आहे, असं बोललं गेलंय. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही.
  2. भाजपची सावध भूमिका- भाजपकडून अजूनही शिंदेंना सत्तास्थापनेचा प्रस्ताव नसल्याचं अनेकदा शिंदे गटाकडून माध्यमांसमोर बाजू मांडणारे दीपक केसरकर यांनी सांगितलंय. त्यामुळे हा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे. यामुळे एकनाथ शिंदे कोणताही निर्णय गडबडीत घेत नाहीयत किंवा ते  शिवसेवेलाही स्पष्टपणे विरोध करत नाहीयत.
  3. विरोधाभास दाखवला जातोय?- भाजप आणि शिंदे गटाकडून विरोधाभास दाखवला जातोय का, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. कारण कोअर कमिटीच्या बैठकीत सत्तास्थापनेविषयी चर्चा झाली, अशी सूत्रांची माहिती आहे. तर भाजपकडून राज्यातील परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं. अशी प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यामुळे सगळा संभ्रम आहे.

… तर बाहेर कशासाठी आले?

फोनवर बोलत बोलत एकनाथ शिंदे गेटपर्यंत आले तर प्रतिनिधी त्यांना बोलावणारच हे त्यांनाही माहिती होते. पण माईक समोर धरल्यानंतर मी काहीही बोलणार नाही. आमचे प्रवक्ते दीपक केसरकर सविस्तर भूमिका मांडत आहेत, असंच एकनाथ शिंदेंनी सांगितलं. शिंदेंना स्पष्ट बोलायचं नव्हतं तर अशा रितीने ते गेटपर्यंत आलेच कशाला? शिंदे गटात नक्की काहीतरी वेगानं हालचाली सुरु आहेत, फोनवर बोलणं सुरु आहे.. महत्त्वाची चर्चा सुरु आहे.. असं काहीतरी त्यांना दाखवायचं होतं? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.