उद्धव ठाकरे ठाण्यापासून कोकणापर्यंत हद्दपार; देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत काही नरेटिव्ह सेट केले होते. हे नरेटिव्ह खालच्या वर्गापर्यंत गेले. ते दूर करण्यात आपण कमी पडलो. हे आपलं अपयश आहे, अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे ठाण्यापासून कोकणापर्यंत हद्दपार; देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दावा
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2024 | 5:35 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ठाकरे गट हा ठाण्यापासून कोकणापर्यंत हद्दपार झाला आहे. या भागात त्यांची एकही जागा निवडून आलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत सहानुभूती होती हा मुद्दाच निकाली निघतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत निवडणुकीचं विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं नरेटिव्ह करण्यात आला. ठाण्यापासून कोकणापर्यंत ठाकरे गटाला जागा नाही. पालघरमध्येही एकही जागा नाही. मुंबईच्या जागा कुणाच्या भरवश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी त्यांना वोट दिलं नाही. वरळीत फक्त सहा हजार मते त्यांना मिळाली. शिवडीत 30 ते 45 हजार मतांचा लीड घ्यायला हवा होता. विक्रोळी, भांडूपमध्ये 60 हजाराचा लीड घ्यायला हवा होता. ते 8 हजारावर थांबले. एका विशिष्ट समाजाच्या मतांवर त्यांनी आघाडी घेतली आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांची कबुली

या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी अनेक नरेटिव्ह तयार केले. हे नरेटिव्ह दूर करण्यात किंवा रोखण्यात आपण अपयशी ठरलो, अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधकांनी भाजपने गुजरातला उद्योग पळवल्याचा नरेटिव्ह तयार केला. 2023 आणि 2024 मध्ये महाराष्ट्र गु्ंतवणुकीत पहिल्या क्रमांकवर आपण आणला. ठाकरेच्या काळात महाराष्ट्र खाली होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

चौथा पक्षही निवडणुकीत होता

आपली लढाई फक्ती तीन पक्षांविरोधात नव्हती. तर एक चौथा पक्षही लोकसभेत कार्यरत होता. तो म्हणजे नरेटिव्ह बदलणं. विरोधकांनी काही नरेटिव्ह सेट केले होते. त्याच्याकडे आपण लक्षच दिलं नाही. त्याच्याविरोधात आपण लढलो नाही. संविधान बदलणार हा नरेटिव्ह विरोधकांनी निर्माण केला. आपण हा नरेटिव्ह बदलू शकलो नाही. हा नरेटिव्ह खालपर्यंत झिरपत गेला. खरंच भाजप संविधान बदलणार का? असं सामान्य लोकांना वाटू लागलं होतं . दलित आणि आदिवासी समाजात हा नरेटिव्ह तयार झाला. असा नरेटिव्ह झाला तरी हा नरेटिव्ह एखाद्या निवडणुकीत चालतो. पुढच्या निवडणुकीत चालत नाही. कोणत्याही खोट्या मुद्द्याची ताकद एका निवडणुकीपुरती असते. नंतर राहत नाही, असं फडणवीस म्हणाले.

वर्षभर संविधान महोत्सव

मोदी जेव्हा जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी नेता निवडीच्या आधी संविधानाची पूजा केली. त्यांनी सांगितलं संविधान सर्वात महत्त्वाचं आहे. पुढचं एक वर्ष संविधानाचा महोत्सव या देशात साजरा केला जाणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.