राज ठाकरेंच्या सभा आमच्या सांगण्यावरुन नाहीत : अजित पवार

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती. अजित पवारांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 5 वर्षात मोदी सरकारने काही केले नाही, त्यामुळे लोकच आता चौकीदार चोर है असं म्हणू लागले आहेत, असं अजित […]

राज ठाकरेंच्या सभा आमच्या सांगण्यावरुन नाहीत : अजित पवार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती. अजित पवारांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

5 वर्षात मोदी सरकारने काही केले नाही, त्यामुळे लोकच आता चौकीदार चोर है असं म्हणू लागले आहेत, असं अजित पवार म्हणाले.  याशिवाय अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांबाबतही भाष्य केलं.

राज ठाकरे हे आमच्या सांगण्यावरुन नव्हे तर उस्फूर्त सभा घेत आहेत,  असा दावा अजित पवार यांनी केला.  राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या सभेची सध्या चर्चा आहे. सत्ताधाऱ्यांनीही राज यांच्या सभेला गंभीरतेने घेतले आहे, असं अजित पवार म्हणाले.

अवघ्या तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदी सरकारविरोधात जबरदस्त टीका केली. त्यावेळी त्यांनी ज्यांच्यावर तुमचा विश्वास राहिला नाही, त्यांना पुन्हा निवडून देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी भाजपविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं.

दरम्यान, राज ठाकरे हे राज्यभरात 8 ते 10 सभा घेणार आहेत. महाराष्ट्रभरात 10 सभा घेऊन, भाजपप्रणित केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनजागृती करणार आहेत. राज ठाकरे यांनी यासंदर्भात गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कातील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पहिल्या टप्प्यातील सहा सभास्थळांची आणि तारखांची निश्चिती झाली आहे.

जातीवर बोलणार नाही : अमोल कोल्हे

शिरुर लोकसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षात कुठलाही विकास झाला नसून, फक्त जातीय राजकारण केले जात आहे. मात्र जातीय बोलणार नसून मी फक्त विकासावर बोलणार असं शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे म्हणाले. माझी संभाजी महाराज ही मालिका बंद करण्याचाही प्रयत्न झाला, मात्र मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो. त्यांनी योग्य निर्णय दिला, असंही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

शिरुर लोकसभा

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. अमोल कोल्हे हे नुकतेच शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आले आहेत.

महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.

संबंधित बातम्या

संदीप देशपांडेंकडून शिवसैनिकांसाठी ‘खास’ फोटो शेअर  

राज ठाकरेंच्या पहिल्या 6 सभांच्या तारखा, ठिकाणं ठरली! 

विनोद तावडेंना मनसे नेते संदीप देशपांडेंचं ओपन चॅलेंज 

भाजपवाले म्हणतात, राष्ट्रवादी-काँग्रेस मला वापरुन घेतायत, पण मी वेडा नाही : राज ठाकरे 

बाळासाहेब ठाकरेंच्या मतदानावर बंदी का आणि कुणी घातली?  

लातूरच्या सभेत मोदींकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा  

मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.