आमचं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ : प्रकाश आंबेडकर
नांदेड : आमचं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ, असं आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं प्रचार सभेत आंबडेकर बोलत होते. नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलंय, अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातच सरकार आता व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. सरकार व्यापाऱ्यांना धमकाऊन भीती घालून […]
नांदेड : आमचं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ, असं आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं प्रचार सभेत आंबडेकर बोलत होते. नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलंय, अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातच सरकार आता व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय.
सरकार व्यापाऱ्यांना धमकाऊन भीती घालून भाजपचा प्रचार करायला भाग पाडतंय, असा आरोप आंबडेकर यांनी केला. दरम्यान, व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत हे मला माहित आहे, असं सांगून त्यांनी आश्वासन दिलं की आमचं सरकार जर आलं तर या जुन्या नोटा पुन्हा बदलून देण्यात येतील. मात्र या चोरांचं सरकार पुन्हा येऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी केलंय.
आंबडेकर यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली हे विशेष. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच आंबडेकर यांची नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं सभा झाली. वंचित बहुजन आघाडीच्या या सभेला भर उन्हात लोकांनी मोठी गर्दी केली होती. हिंगोली लोकसभा निवडणुकीतील वंचित आघाडीच्या उमेदवारासाठी ही सभा होती. या सभेला हदगाव हिमायत नगर तालुक्यातून अनेक लोक उपस्थित होते. याच सभेत अनेक लोकांनी निवडणुकीसाठी म्हणून आंबडेकर यांना आर्थिक मदतही दिली.
एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपने राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. औरंगाबादमधून एमआयएमचे इम्तियाज जलील हे लढत आहेत, तर प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापुरातून लढणार आहेत. भाजपला मत न देता आपल्या हाती सत्ता द्यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली.