एवढा मोठा नेता नाव घेऊन टीका करतो, यावरुनच त्यांची पातळी समजते : दानवे
औरंगाबाद : एवढा मोठा नेता नाव घेऊन व्यक्तीगत टीका करतो, त्यामुळे त्यांची पातळी कुठपर्यंत गेली हे लक्षात येतं, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. औरंगाबादेत पार पडत असलेल्या जिल्हास्तरीय सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनासाठी दानवे औरंगाबाद शहरात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते नाव घेऊन असं […]
औरंगाबाद : एवढा मोठा नेता नाव घेऊन व्यक्तीगत टीका करतो, त्यामुळे त्यांची पातळी कुठपर्यंत गेली हे लक्षात येतं, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. औरंगाबादेत पार पडत असलेल्या जिल्हास्तरीय सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनासाठी दानवे औरंगाबाद शहरात आले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून ते नाव घेऊन असं वक्तव्य करत आहेत. तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही त्या पातळीवर जात नाही, आम्ही टीका करत नाही त्यांनी देखील करू नये. एवढ्या मोठ्या वरच्या लेव्हलचा नेता व्यक्तीगत नावाशी बोलतो. त्यावरून त्यांची पातळी कुठपर्यंत जाऊन पोहोचली हे लक्षात येतं, असं दानवे म्हणाले. वाचा – मुख्यमंत्री मध्यरात्री एक वाजता दिल्लीत, या तीन मुद्द्यांवर मोदींशी चर्चा
असं वक्तव्य करणं चुकीच आहे. मलाही बोलता येतं, माझ्याकडे देखील शब्द आहेत. मात्र आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत. दोनही बाजूंनी प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत व्यक्त केला. कर्जमाफीबाबत योग्य अधिकाऱ्यांकडे जाऊन माहिती घ्या, योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. कोणी राहिलं असेल तर आम्ही कटीबद्ध आहोत असं दानवे यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात दुष्काळी दौरा करताना सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. शिवाय पंढरपूरच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला होता. चौकीदार चोर है, अशी टीका करत त्यांनी थेट मोदींवर निशाणा साधला. वाचा – उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलवलं, बीडच्या शेतकऱ्याचं कर्ज काही तासात माफ
कर्जमाफीवरुन उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली होती. बीडमधील सभेत एका शेतकऱ्याला त्यांनी स्टेजवर बोलावलं आणि कर्जमाफी झालीय का विचारलं. या शेतकऱ्याला कर्जमाफीचं प्रमाणपत्रही मिळालं होतं. पण खात्यात पैसे जमा झाले नव्हते. अखेर काही तासातच या शेतकऱ्याचे पैसे खात्यात जमा झाले.