भाजप कार्यालय रातोरात पेटवलं, ‘तृणमूल’वर आरोप
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे एक कार्यालय पेटवून देण्यात आलं आहे. आसनसोल इथल्या भाजप कार्यालयाला रविवारी आग (Asansol BJP office burn) लावण्यात आली.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे एक कार्यालय पेटवून देण्यात आलं आहे. आसनसोल इथल्या भाजप कार्यालयाला रविवारी आग (Asansol BJP office burn) लावण्यात आली. याप्रकरणी भाजपने तृणमूल काँग्रेसवर (Asansol BJP office burn) आरोप केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हं आहेत. सध्या पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी कोलकाता पेटलं होतं. त्यावेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.
दरम्यान, गेल्या महिन्यातही कोलकात्यात 2 डिसेंबर रोजी एका संघ स्वयंसेवकाची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. त्याआधी 30 नोव्हेंबरला तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांची राडेबाजी झाली होती. त्यावेळी 13 जण जखमी झाले होते. पश्चिम बंगाल हे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या संघर्षाचं केंद्र बनलं आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर हिंसाचार आणि दंगलीचा आरोप करत आहेत.
Asansol: A BJP office in Salanpur village was set ablaze last night. BJP has alleged that TMC is behind the incident. Police has begun investigation. #WestBengal pic.twitter.com/wlYdr2qAle
— ANI (@ANI) January 13, 2020
याआधी लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये मोठा राडा झाला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह हे निवडणूक प्रचाररॅली घेण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आले होते, तेव्हा त्यांच्या रॅलीत दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांची प्रकरणे उघडकीस आली होती. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरही अनेक जीवघेणे हल्ले झाले होते.