मोदींची पश्चिम बंगालमध्ये रॅली, मिथुन चक्रवर्तींचीही ‘एन्ट्री’; पश्चिम बंगालची हवा बदलणार?
मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळ येऊन ठेपल्याची अटकळ जाणकारांकडून बांधली जात आहे. | Mithun Chakraborty bjp
कोलकाता: केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Election 2021) तारखा जाहीर केल्यापासून राज्यातील हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंत तृणमूल काँग्रेसमधील अनेक बड्या नेते आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपच्या गोटात दाखल झाले होते. याशिवाय, अनेक सेलिब्रिटीही भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. (BJP leader Kailash Vijayvargiya meet met actor Mithun Chakraborty)
यामध्ये सगळ्यात जास्त अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची चर्चा आहे. मिथुन चक्रवर्ती हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. मात्र, त्यांच्याकडून किंवा भाजपकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी रविवारी मिथून चक्रवर्ती यांच्या बेल्गाचिया येथील निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही. मात्र, मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळ येऊन ठेपल्याची अटकळ जाणकारांकडून बांधली जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मिथुन चक्रवर्तींची अट?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटल्यानंतर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याशी मिथुन यांनी फोनवरून ही इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पश्चिम बंगालमध्ये येणार आहेत.
कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पंतप्रधान मोदींची पहिली सभा होणार आहे. यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणआधी मिथुन चक्रवर्ती यांचे भाषण होणार असल्याचीही चर्चा आहे.
Mithun Chakraborty to attend PM Modi’s mega rally at Brigade Parade Ground in Kolkata today: Kailash Vijayvargiya, BJP National General Secretary & party’s central observer for West Bengal
(file photo) pic.twitter.com/abhFULJXJ6
— ANI (@ANI) March 7, 2021
सौरव गांगुली भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार (BJP CM Candidate) कोण, याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेत आता अनपेक्षितपणे भारतीय क्रिकेट संघाच माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचे नाव पुढे येताना दिसत आहे. सध्या कोलकाला आणि दिल्लीतील भाजपच्या वर्तुळात सौरव गांगुलीच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सौरव गांगुलीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून ममता बॅनर्जी यांच्याविरोधात रिंगणात उतरावे, अशी भाजपची इच्छा आहे.
पश्चिम बंगालमध्य मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी भाजपकडे नेत्यांची वानवा नाही. मात्र, हा चेहरा बंगाली अस्मितेला साद घालणारा आणि जनतेला आपलासा वाटणारा हवा, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत बराच खल सुरु आहे. सौरव गांगुलीने ही ऑफर नाकारल्यास तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बड्या नेत्यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपादाचा दावेदार म्हणून रिंगणात उतरवले जाऊ शकते.
संबंधित बातम्या:
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी रेल्वे मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश
तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार?, नाराज 76 नेते मुकुल रॉय यांना भेटले; भाजप प्रवेशाची शक्यता
ममता बॅनर्जींविरोधात मुख्यमंत्रीपदाचा भाजपचा चेहरा कोण? दिग्गज क्रिकेटपटुच्या नावाची जोरदार चर्चा
(BJP leader Kailash Vijayvargiya meet met actor Mithun Chakraborty)