West Bengal | अर्पिता मुखर्जींच्या घरी नोटांचे ढिगारे, पश्चिम बंगालचा शिक्षक भरती घोटाळा उघड, भाजप नेते म्हणतात पिक्चर अभी बाकी है…
अर्पिता मुखर्जी यांच्या घरी एवढी रक्कम सापडल्यानंतर बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी टीएमसी आणि पार्थ चटर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
मुंबईः महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही (West Bengal Scam) शिक्षक भरती घोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी काल एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी (Arpita Mukharjee) यांच्या घरावर तसेच इतर ठिकाणांवर छापे मारले. ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी (Parth Chatarjee) यांच्या त्या निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. ईडीला अर्पिता मुखर्जी यांच्या घरी नोटांचे असंख्य बंडल आढळून आले. ईडी अधिकाऱ्यांनी मशीनच्या मदतीने या नोटांची गिनती केली. यावेळी या घरातच तब्बल 20 कोटी रुपये आढळून आले. तसेच येथून 20 मोबाईलही जप्त करण्यात आले. घटनास्थळी आढळलेल्या नोटांमध्ये दोन हजार आणि पाचशेच्या नोटांचा ढिगाराच लागला होता. अर्पिता यांच्यासंबंधीच्या ठिकाणांवर अजूनही ईडीची कारवाई सुरु असून या घोटाळ्यात आणखी कोण कोण शामिल आहे, याचा तपास ईडीमार्फत करण्यात येत आहे.
राजकीय कनेक्शन काय?
ईडीने ज्यांच्याविरोधात छापेमारी केली, त्या अर्पित मुखर्जी पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. पार्थ चटर्जी हे ममता बॅनर्जी सरकाकरमध्ये सध्या उद्योगमंत्री असून पूर्वी त्यांच्याकडे शिक्षण खातं होतं. शुक्रवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पार्थ चटर्जींच्या घरावर छापा मारला. एसएससी घोटाळ्या प्रकरणी त्यांची चौकशी झाली. त्याच वेळी काही अधिकाऱ्यांनी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावरही छापे मारले. येथून 20 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. नोटांच्या ढिगाऱ्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याच शिक्षक भरती घोटाळ्यातून कमावलेल्या या नोटा असल्याचे बोलले जात आहे.
भाजप नेत्यांकडून टीका
अर्पिता मुखर्जी यांच्या घरी एवढी रक्कम सापडल्यानंतर बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी टीएमसी आणि पार्थ चटर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. टीएमसी नेत्यांचे आणखी अनेक घोटाळे बाहेर येणं बाकी आहे. हे फक्त ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है.. असे मेसेज सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटरवर मुखर्जी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच उद्योग मंत्री पार्थ चटर्जी यांचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे ट्विट
“Guilty by Association” – A legal phenomenon used to describe when an individual is guilty of committing a crime through knowing someone else.
Just saying.
Yeh toh bas trailer hai, picture abhi baki hai… pic.twitter.com/4fM9gbLWrq
— Suvendu Adhikari • শুভেন্দু অধিকারী (@SuvenduWB) July 22, 2022