West Bengal SSC Scam : ‘कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा’ अटकेनंतर जेव्हा पार्थ चटर्जी ममतांना फोन करतात!

पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग (WB-SSC) घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी यांची आज वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

West Bengal SSC Scam : 'कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा' अटकेनंतर जेव्हा पार्थ चटर्जी ममतांना फोन करतात!
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 11:25 AM

कोलकाता : पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग (WB-SSC) आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळ भरती घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले कॅबिनेट मंत्री आणि माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee) यांची आता वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ईडीचे (ED) अधिकारी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने भुवनेश्वरला घेऊन जाणार आहेत. तर दुसरीकडे पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जी यांना आज विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. 23 जुलैरोजी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी तब्बल चारवेळेस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन लावला. मात्र समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे.22 जुलैरोजी ईडीने पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि प्राथमिक शिक्षण मंडळ भरती घोटाळा प्रकरणात पार्थ चॅटर्जी व त्यांच्या सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापेमारी केली होती. या छापेमारीमध्ये तब्बल वीस कोटी रुपयांची रोकड ईडीच्या हाती लागली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

वीस कोटींची रोकड जप्त

इंडिया टुडेच्या रिपोर्टसनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक होते, तेव्हा तो याबद्दल कोणत्याही एका व्यक्तीला माहिती देऊ शकतो. ज्यामध्ये कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा मित्र अशा व्यक्तींचा समावेश असतो. पार्थ चॅटर्जी यांनी अटकेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चारदा फोन केला. मात्र त्यांना समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.कृपया पुन्हा प्रयत्न करा हेच त्यांना ऐकावे लागले. ईडीने 22 जुलैरोजी पार्थ चॅटर्जी व त्यांच्या सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापेमारी केली होती. या छाप्यामध्ये अधिकाऱ्यांनी तब्बल वीस कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे.ज्यामध्ये पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांच्या बंडलांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

आज वैद्यकीय तपासणी

आज पार्थ चॅटर्जी यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्यासाठी त्यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने भुवनेश्वरला नेण्यात येणार आहे. तर त्यांच्या सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जी यांना आज विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. चाटर्जी यांच्यावर पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि प्राथमिक शिक्षण मंडळ भरती घोटाळ्याचा आरोप आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.