Vedanta Project: ‘वेदांता’ गुजरातला जाण्यामागची नेमकी कारणे काय? फडवणीसांनी स्पष्ट करुन सांगितले
महाराष्ट्राला डावलून हा प्रोजेक्ट गुजरातला का असा सवालही राज्य सरकारने उपस्थित केला होता. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पत्रव्यवहारही केला होता. पण अनिल अग्रवाल यांनी याकरिता आता उशिर झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
मुंबई : (Vedanta Project) ‘वेदांता’ प्रकल्प हा (Gujrat) गुजरातला गेला असला तरी त्यावरुन सुरु असलेले राजकारण महाराष्ट्रात हे सुरुच आहे. आतापर्यंत वेदांता प्रकल्पावरुन अनेकांनी आप आपले मत मांडले आहे. पण शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी याबाबत काय झाले ते (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांनी वेदांता प्रकल्पाबाबत माहिती घेतली तेव्हा खूप उशिर झाला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनेच वेळकाढूपणा केल्याने हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. शिवाय तो महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्वकश प्रयत्न केले पण उशिर झाला होता असे फडणवीस म्हणाले आहेत.
गुजरात हा देखील देशातलेच एक राज्य असून महाराष्ट्राचा भाऊ असे संबोधले जाते. त्यामुळे हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही असेही फडणवीस म्हणाले आहेत. सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती. त्यामुळे आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
महाराष्ट्राला डावलून हा प्रोजेक्ट गुजरातला का असा सवालही राज्य सरकारने उपस्थित केला होता. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पत्रव्यवहारही केला होता. पण अनिल अग्रवाल यांनी याकरिता आता उशिर झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पण गुजरातमध्ये डील झाल्याने अधिकचा आग्रह करता आला नाही. पण वेदांता शिवाय इतर प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी अग्रवाल हे इच्छूक असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.