Raju Shetti : ‘मविआ’ बद्दल दु:ख नाही अन् भाजपाचे देणे घेणे नाही, राजकीय अस्थिरतेबद्दल काय म्हणाले राजू शेट्टी ?
महाविकास आघाडी सरकारबद्दल आता जो तो प्रश्न उपस्थित करु लागला आहे. मात्र, काही काळ महाविकास आघाडीबरोबर सत्तेत राहणाऱ्या राजू शेट्टी यांचा अंदाज काही वेगळाच आहे. महाविकास आघाडी सरकार पडतंय याबाबत आपल्याला अजिबात दु:ख नाही. कारण हे सरकार काही जनताभिमुख नव्हते. तर अनैसर्गिक युतीमधून झालेले हे सरकार होते.
सांगली : राज्याच्या राजकीय अस्थिरतेबद्दल आता घटक पक्ष देखील आपले मत व्यक्त करु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना घेऊन आपला एक स्वतंत्र गट निर्माण केला आहे. त्यामुळे सरकारचे काय होणार असा सवाल उपस्थित होत असतानाच मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Raju Shetti) राजू शेट्टी यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवरही बोचरी टिका केली आहे. सध्याच्या वातावरणावरुन जो तो आपले राजकीय स्वार्थ साधत आहे. (Maharashtra Politics) राज्याचे किंवा राष्ट्राच्या हिताचे कुणालाही देणे-घेणे राहिलेले नाही. या वर्चस्वाच्या लढाईत मात्र लोकशाही ही टिकून राहणार की नाही याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. राज्याच्या राजकारणाला वेगळी परंपरा आहे. याचा विसर राजकिय पक्षांना पडलेला आहे. पण जनतेच्या दृष्टीकोनातून घातक असून हेच लोक लोकशाहीचा खून करतील अशी शंका देखील शेट्टी यांनी उपस्थित केलीय.
ये तो होना ही था..!
महाविकास आघाडी सरकारबद्दल आता जो तो प्रश्न उपस्थित करु लागला आहे. मात्र, काही काळ महाविकास आघाडीबरोबर सत्तेत राहणाऱ्या राजू शेट्टी यांचा अंदाज काही वेगळाच आहे. महाविकास आघाडी सरकार पडतंय याबाबत आपल्याला अजिबात दु:ख नाही. कारण हे सरकार काही जनताभिमुख नव्हते. तर अनैसर्गिक युतीमधून झालेले हे सरकार होते. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन महिन्यापूर्वीच पाठिंबा काढून घेतला होता. सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे बाजूला राहिले आहेत. शिवाय याबाबत ना सत्ताधाऱ्यांना घेणे-देणे आहे ना विरोधकांना. आता जनतेनेच योग्य विचार कऱणे गरजेचे असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
सत्तेसाठी भाजप कोणत्याही स्थराला
सत्तेसाठी भाजप हे कोणत्याही स्थराला जाऊ शकते. यावेळीच नाहीतर यापू्र्वीही मध्य प्रदेश, कर्नाटकात हे घडून आले आहे. आता ते महाविकास आघाडीच्या बाबतीत होताना दिसत आहे. भाजपाकडून ज्या पध्दतीने पाशवी वृत्ती दाखवून सरकार हस्तगत करतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर ही नामुष्की ओढावली आहे तर भाजप केंद्रातील सत्तेचा उपयोग कोणत्याही परस्थितीमध्ये राजकीय स्वार्थ साधण्यासाठी करीत आहे.
लोकशाहीबद्दल मात्र चिंता व्यक्त
राजकीय पक्षांच्या भूमिकेमुले लोकशाहीची व्याख्याच बदलत आहे. हे सरकार जनतेसाठी नाही स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेचा उपयोग करीत आहे. हे आता नारगिकांपासूनही लपून राहिलेले नाही. गेल्या अडीच राज्याच्या हिताचे कोणते निर्णय झाले नाही तर आता या राजकीय घडामोडीत विकासाची काय कामे होणार असा सवाल उपस्थित करीत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि भाजपावर सडकून टिका केली आहे. सध्याच्या राजकीय स्थितीमुळे मात्र, लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.