Shivsena : अपयश राज्य सरकाराचे अन् आरोप दुसऱ्यावरच, वेदांता प्रकल्पावर काय म्हणाले माजी मुख्यमंत्री?

| Updated on: Sep 18, 2022 | 12:50 PM

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विभागप्रमुखांच्या बैठका घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष संघटनेवर त्यांनी भर दिला आहे.

Shivsena : अपयश राज्य सरकाराचे अन् आरोप दुसऱ्यावरच, वेदांता प्रकल्पावर काय म्हणाले माजी मुख्यमंत्री?
वेदांता प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : (Vedanta Project) वेदांता प्रकल्प गुजरातला नेमका गेला कुणामुळे..? यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याबाबत सांगितले असले तरी दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री राहिलेले (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांचे काय म्हणणे आहे हे देखील तेवढेच महत्वाचे होते. अखेर आरोप-प्रत्यारोप होत असतानाचा उद्धव ठाकरे यांनी वेदांताबाबत नेमके काय झाले हे सांगितले. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरु व्हावा यासाठी प्रयत्न केले. शिवाय त्यादृष्टीने हालचालीही सुरु झाल्या मात्र, आपले अपयश उघडे पडू नये म्हणून राज्य सरकारकडून (MVA) मविआ वर आरोप केले जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे वेदांता गुजरातला गेला ही चूक कोणाची हे अद्यापही गुलदस्त्यामध्येच आहे.

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विभागप्रमुखांच्या बैठका घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष संघटनेवर त्यांनी भर दिला आहे. तर आता ठाकरे कुटुंबियांची चौथी पिढीही राजकारणात येत असल्याचे ते म्हणाले आहेत.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आतापासून नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्या विभागातून अधिकाअधिक नागरिक मेळाव्यासाठी येतील असे नियोजन करावे अशा सूचनाही पक्षप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.