Video : Rajya Sabha Election Result 2022: राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या संजय पवारांसाठी नेमकं काय केलं? प्रफुल्ल पटेलांनी ‘खोलात’ जाऊन सांगितलं

शिवसनेच्या संजय पवारांना राष्ट्रवादीनं 9 मतं दिली. ती मतं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राजेश टोपे, हसन मुश्रीफ यांनी संजय पवारांना दिली. राज्यसभेत मतपत्रिका दाखवूनचं मतदान करावं लागते. आमच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी आपली मतं संजय पवारांना दिलीत.

Video : Rajya Sabha Election Result 2022: राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या संजय पवारांसाठी नेमकं काय केलं? प्रफुल्ल पटेलांनी 'खोलात' जाऊन सांगितलं
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 12:33 PM

नागपूर : जिंकण्यासाठी 42 मतं हवी असताना प्रफुल्ल पटेल यांना 43 मतं मिळाली. ते राज्यसभेवर निवडून आले. त्यानंतर मुंबईवरून नागपुरात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेच्या संजय पवारांसाठी काय केलं, हे सर्व खोलात जाऊन सांगितलं. प्रफुल्ल पटेल म्हणाले, महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटकपक्ष आहेत. त्यामध्ये कुठे काही प्रश्नचिन्ह लागलेलं नाही. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या आमदारांनी सगळ्या उमेदवारांना दिलेल्या कोट्याप्रमाणे मतं दिली आहेत. अनेक अपक्ष आणि लहान पक्ष आहेत. काही अपक्षांची 4-5 मतं मिळाली नाहीत. एक आमचाच मत अवैध ठरला. नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मतं देता आलं नाही. काही लोकांची वेगळी प्रवृत्ती असू शकते. त्याच्या खोलात जावं लागेल. तिन्ही पक्षांनी व्यवस्थित मतदान केलं. आम्ही 42 मतं घ्यायचं ठरविलं होतं. राष्ट्रवादी पक्ष आणि आम्ही उर्वरित 9 मतं संजय पवार यांना दिलं.

ती 9 मतं कुणाची

शिवसनेच्या संजय पवारांना राष्ट्रवादीनं 9 मतं दिली. ती मतं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राजेश टोपे, हसन मुश्रीफ यांनी संजय पवारांना दिली. राज्यसभेत मतपत्रिका दाखवूनचं मतदान करावं लागते. आमच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी आपली मतं संजय पवारांना दिलीत. महाविकास आघाडीत सर्वांच ठरलं होतं की, 42 मतं घ्यायचं. त्यानंतर उर्वरित मतं संजय पवारांना द्यायची. तेवढीचं मतं त्यांना मिळाली. नाशिक जिल्ह्याचे आमदार कांदे यांचं एक मत अवैध ठरलं. त्यामुळं संजय राऊत यांना एक मतं कमी पडलं. या सर्वांच विश्लेषण होणार आहे. त्यासाठी खोलात जावं लागेल. सकाळी चार वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती. सगळ्या बाबींचा तपशील होऊ शकला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पाहा व्हिडीओ काय म्हणालेत, प्रफुल्ल पटेल

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीकडं एकूण 51 मतं

प्रफुल्ल पटेल म्हणाले, राष्ट्रवादीबद्दल अधिकृत सांगू शकतो. राष्ट्रवादीकडं एकूण 51 मतं होती. त्यात एकाही मताचा फरक पडला नाही. हे मी अधिकृतपणे सांगू शकतो. या निवडणुकीत अजित पवार व जयंत पाटील या दोन्ही पुढाऱ्यांनी आमचे मित्रपक्षांसाठी काम केलं. नाराज असलेल्या सगळ्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केलं. एमआयएमच्या लोकांशी बोलले. समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी बोलले. इतरही काही पक्ष आणि आमदार होते. त्यांनाही भेटून मुख्यमंत्र्यांशी भेटवून देणं. त्यांना मदत कशी होईल. यासाठी भरपूर प्रयत्न केले. एक-दोन दिवसांत अधिक चित्र स्पष्ट होईल. विधान परिषदेची मतदान करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. तिथं गुप्त पद्धतीनं मतदान चालते. राज्यसभेसाठी दाखवून मतदान करावं लागते. काही गडबड केली तर कारवाईसुद्धा होऊ शकते. लगेच कळते की, कुणाचं मतं कुठं गेलंय. विजयानंतर प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, राज्य आणि देशाच्या चांगल्या कामासाठी संधीचा वापर करीन. या निवडणुकीत रस्सीखेच होती. 43 मतं पहिल्या फेरीत मिळालीत. त्याबद्दल त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.