Raj Thackeray Thane : राज्य ढवळून काढणारे दहा दिवस; राज यांच्या सभेनंतर नेमकं काय काय घडलं?; वाचा विशेष रिपोर्ट
राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात उत्तर सभा आहे, राज ठाकरे यांनी यापूर्वी घेतलेल्या सभेत हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मशिदीवर भोंगे दिसले तर आम्ही देखील स्पिकरवर हनुमान चालिसा लावू असे म्हटले होते. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.
मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात उत्तर सभा आहे, राज ठाकरे यांनी यापूर्वी घेतलेल्या सभेत हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मशिदीवर भोंगे दिसले तर आम्ही देखील स्पिकरवर हनुमान चालिसा लावू असे म्हटले होते. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. तसेच या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर (SHIVSENA) देखील सडकून टीका केली होती. मशिदीवरील भोंग्याच्या वक्तव्यामुळे राज ठाकरे हे वादात सापडले होते, याच वक्तव्याचा धागा पकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांकडून राज यांच्या या भुमिकेचे स्वागत देखील करण्यत आले. शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि लगेचच मनसे व भाजपाची युती होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं. याच काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार, एखादी मोठी घोषणा करणार का? विरोधकांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसंत मोरेंना शहराध्य पदावरून हटवले
दरम्यान राज ठाकरे यांच्या भाषणानंतरची गेल्या दहा दिवसांमधील सर्वात मोठी घडमोड म्हणून ज्या घटनेचा उल्लेख करता येईल ती म्हणजे वसंत मोरे यांना मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी बाबर यांची नियुक्ती करण्यात आली. राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांविरोधात उघड -उघड भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान याबाबत वसंत मोरे यांना विचारले असता आपण राज ठाकरे यांच्यासोबतच मनसेमध्ये राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
शिर्डीतून अजित पवारांची टीका
शिवतीर्थावर झालेल्या याच भाषणामध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यासोबतच महाविकास आघाडीवर देखील जोरदार टीका केली होती. या टीकेला महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांकडून जोरदार प्रत्त्युतर देण्यात आले. अजित पवार हे शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. इतके दिवस झोपले होते का? असा सवाल राज ठाकरे यांचे नाव न घेतला अजित पवार यांनी केला होता. तसेच संजय राऊत यांनी देखील राज यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.