BJP : गृह, अर्थ तर ठेवलेच पण जलसंपदा आणि ऊर्जासारखी महत्त्वाची खातीही फडणवीसांकडे, काय आहे या खात्यांचं महत्त्व?, काय आहेत कारणं?
युती सरकारच्या काळातही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तरी, जलसंधारणाच्या कामावर त्यांचे विशेष लक्ष होते. शिवाय या खात्याच्या माध्यमातून पायाभूत विकास आणि थेट जनतेशी संलग्न कामे मार्गी लागतात. थेट ग्राउंड स्थरावर उतरुन काम करता येणारे खाते म्हणजे जलसंधारण. 2015 साली देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले होते. पाण्याची पातळी वाढवून आवर्षणाच्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कायमचा प्रस्न मार्गी लावण्याचा त्यांचा निर्धार होता.
मुंबई : अखेर दिलेल्या शब्दानुसार (Eknath Shinde) शिंदे सरकारने 15 ऑगस्टपूर्वीच खाते वाटपही केले आहे. विरोधकांकडून होत असलेली टीका आणि राज्यातील कारभार सुरळीत व्हावा या अनुशंगाने हा निर्णय शिंदे सरकारने घेतला असला तरी (Account Allocation) खातेवाटपात भाजपालाच ढळते माप मिळाले आहे. यातच उपमुख्यमंत्री असलेले (Devandra Fadnvis) देवेंद्र फडणवीसच खऱ्या अर्थाने राज्याचा कारभार हाकणार का असा सवाल त्यांच्याकडील खाती पाहिल्यानंतर मनात येणारच आहे. त्यांच्याकडे अर्थ आणि गृह खातं हे निश्चित मानले जात होते पण या दोन महत्वाच्या खात्याबरोबर जलसंपदा आणि उर्जा यासारखी महत्वाची खातीही त्यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत. त्यामुळे शहरी बरोबर ग्रामीण जनतेशी संलग्न असलेली खाते फडणवीसांकडेच राहणार आहेत. शिवाय जलसंपदा खात्याच्या माध्यमातून गतवेळी अधुरे राहिलेले त्यांचे स्वप्न पूर्ण होणार का हे देखील पहावे लागणार आहे.
जलसंधारणाच्या कामावर भर
युती सरकारच्या काळातही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तरी, जलसंधारणाच्या कामावर त्यांचे विशेष लक्ष होते. शिवाय या खात्याच्या माध्यमातून पायाभूत विकास आणि थेट जनतेशी संलग्न कामे मार्गी लागतात. थेट ग्राउंड स्थरावर उतरुन काम करता येणारे खाते म्हणजे जलसंधारण. 2015 साली देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले होते. पाण्याची पातळी वाढवून आवर्षणाच्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कायमचा प्रस्न मार्गी लावण्याचा त्यांचा निर्धार होता. शिवाय तशी कामेही राज्यात झाली होती. मात्र, महाविकास आघाडी काळात या महत्वाच्या योजनेवर आक्षेप घेत देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे ही योजना कशी यशस्वी होती आणि विरोधकांना दाखवून देण्यासाठी फडणवीसांनी हे खातेच आता आपल्याकडे घेतले आहे. त्यामुळे राजकारणाबरोबर जलसंधारण होणेही तेवढेच गरजेचे आहे.
उर्जा खात्यातून जनतेची सेवा
ज्या खात्याच्या माध्यमातून थेट जनतेचे प्रश्न सोडवले जातील अशी खाती देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवली आहे. जलसंधारण पाठोपाठ ऊर्जा खात्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न तर मार्गी लावता येतात पण गेल्या काही दिवसांपासून ह्या खाते अडचणीत आहे. मध्यंतरी तरी महावितरणचे खासगीकरण होणार इथपर्यंत झाले होते. मात्र, अशा खात्यालाच उभारी देण्याचा प्रय़त्न हा फडणवीसांचा असणार आहे. विजेचा वाढता वापर आणि त्यापेक्षा कैक पटीने वाढती थकबाकी यासारखी आव्हाने असली तरी थेट जनतेशी संबंधित खात्यावर फडणवीसांचा भर राहिलेला आहे.
महत्वाची खाती फडणवीसांकडेच
खाते वाटपात भाजपच सरशी ठरणार हे निश्चित असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह, अर्थ याबरोबर विधी आणि न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, उर्जा आणि राजशिष्ठाचार ही खातीही फडणवीस यांच्याकडेच असणार आहेत. यापूर्वीही त्यांनी गृह आणि अर्थ खाते त्यांच्याकडेच होते पण यामध्ये आणखी भर आणि तेही महत्वाच्या खात्याची पडल्याने जनतेशी थेट संपर्क राहिल अशी खाती त्यांच्याकडे आहेत. भविष्याचा वेध घेत त्यांनी ही खाते घेतली असल्याचेही नाकरता येत नाही.