Video : एकनाथ शिंदेंना फोन करून परत पक्षात बोलवा, शिवसेना एक कुटूंब…असं म्हणत राजू विटकर हमसूनहमसून रडले

राजू विटकर यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाहीतर त्याअनुशंगाने त्यांनी रात्रीतून मुंबईही जवळ केली होती. मुंबईतील एका शिंदे गटाच्या मेळाव्यातही ते सहभागी झाले होते. मात्र, घरी परतल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी शिवसेनेने आतापर्यंत आपल्याला काही कमी केले नाही.

Video : एकनाथ शिंदेंना फोन करून परत पक्षात बोलवा, शिवसेना एक कुटूंब...असं म्हणत राजू विटकर हमसूनहमसून रडले
शिंदे गटात गेलेले राजू विटकर पुन्हा शिवसेनेत सहभागी झाले आहेत.
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 12:38 PM

पुणे :  (Eknath Shinde) शिंदे गटामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून सत्तांतरानंतर या गटामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाच (Shiv Sena Party) शिवसेना पक्षाची झालेली अवस्था पाहून शिंदे गटात सहभागी झालेले (Raju Vitkar) राजू विटकर हे पुन्हा शिवसेना पक्षात परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतून आमदार, खासदार एवढेच नाहीतर पदाधिकारी देखील शिंदे गटात सहभागी होत असताना राजू विटकर यांनी घेतलेला निर्णय हा नवा पायंडा पाडणार का? असा सवाल उपस्थित करीत आहे. एवढेच नाहीतर एकनाथ शिंदे यांना फोन करुन परत पक्षात बोलवा अशी आर्त हाक त्यांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना पत्रातून दिली आहे. भावनिक आवाहन करताना पुणे झोपटपट्टी शिवसेनेचे विभाग प्रमुख हे हमसूनहमसून रडले आहेत.

अन् विटकर यांना पश्चाताप

राजू विटकर यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाहीतर त्याअनुशंगाने त्यांनी रात्रीतून मुंबईही जवळ केली होती. मुंबईतील एका शिंदे गटाच्या मेळाव्यातही ते सहभागी झाले होते. मात्र, घरी परतल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी शिवसेनेने आतापर्यंत आपल्याला काही कमी केले नाही. हाच पक्ष आपल्यासाठी चांगला असल्याचे सांगितले, तर तुम्ही घेतलेला निर्णय घरच्या कुणालाच आवडलेला नसल्याचे म्हणताच राजू विचकर यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी आपण शिवसेनेतच सहभागी होणार याबाबत पक्ष प्रमुखांना पत्रही लिहले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्या्ंना पक्ष सोडणे किती मुश्किल असते याचाच प्रत्यय यामधून आला आहे.

उद्धव ठाकरे यांना भाविनक पत्र

सध्या शिवसेना पक्षाची झालेली अवस्था यामुळे शिवसैनिक हा भावनिक होत आहे. त्याचा प्रत्यय आदित्य ठाकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाही आलेला आहे. राजू विटकर यांनी तर पक्ष संघटनेसाठी पुण्यात काम केले आहे. त्यामुळे पक्षाची झालेली अवस्था पाहून आपण परतल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे यासाठी आपण आई जगदंबेला प्रार्थना करीत असल्याचेही सांगितले आहे. एवढेच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करुन पुन्हा शिवसेना कुटुंबात सहभागी करुन घ्यावे असेही पत्रात नमूद केल्याचे सांगताना त्यांना अश्रु अनावर झाले होते.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटातून परतणारे विटकर हे पहिलेच पदाधिकारी

दिवसेंदिवस शिवसेना पक्षातून शिंदे गटात आऊटगोईंग सुरु आहे. पण शिंदे गटातून कोणी परत आला असे झाले नव्हते, पण राजू विटकर यांनी हा निर्णय घेतला. सध्या पक्षातून बंडखोरी करणाऱ्यांवर अनेक प्रकारे टिकाटिपण्णी होत आहे. पण राजू विटकर हे भावनिक होऊन शिवसेनेत परतले. आता या भावनिक लाटेचा किती जणांवर परिणाम होणार हे देखील पहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.