Girish Mahajan: खडसे पुन्हा चर्चेत, भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरचा तो नेमका किस्सा काय?

भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळेच एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र, सत्तांतर झाले आणि सर्व चित्रच बदलून गेले आहे. आता खडसेंच्या मनात नेमके काय सुरु आहे हे महत्वाचे आहे.

Girish Mahajan: खडसे पुन्हा चर्चेत, भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरचा तो नेमका किस्सा काय?
मंत्री गिरीश महाजन यांचे खळबळजनक वक्तव्य
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 8:20 PM

जळगाव : मध्यंतरी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच फोन केल्याची चर्चा रंगली होती. ऐवढेच नाही तर खडसे पुन्हा भाजपात (BJP Party) येणार अशी चर्चाही सुरु झाली होती. याबाबत एकनाथ खडसे यांनीच स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा खडसे चर्चेत आले आहेत ते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या वक्तव्याने. नाशिक येथील भाषण संपल्यानंतर एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आले होते. त्यावेळी त्यांनी बसू, काय ते मिटवून टाकू असे म्हटले होते. गिरीश महाजनांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पु्न्हा एकनाथ खडसेंच्या मनात नेमके काय सुरु आहे, याची चर्चा होत आहे.

जळगावातील एका कार्यक्रमानंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नाशिकमधील एकनाथ खडसेंचा तो काय किस्सा याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. नाशिकमध्ये भाषण संपल्यानंतर एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एकदा बसू, काय आहे ते मिटवून टाकू असे म्हणाल्याचे गिरीश महाजनांनी सांगितले आहे..

खडसेंच्या त्या वक्तव्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे ? याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. मात्र, त्या दरम्यान गर्दी जास्त असल्याने मला त्यांना सर्वकाही विचारता आले नसल्याचे गिरीश महाजनांनी सांगितले.

भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळेच एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र, सत्तांतर झाले आणि सर्व चित्रच बदलून गेले आहे. आता खडसेंच्या मनात नेमके काय सुरु आहे हे महत्वाचे आहे.

खडसेंनी बसू, मिटवून टाकू असे म्हणल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बैठका आणि निर्णय होणे महत्वाचे आहे. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की, मग त्यांच्यासोबत बसून त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकूण घेतले जाणार असल्याचे महाजनांनी सांगितले.

एकनाथ खडसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमके काय झाले ? असे विचारले असता याबाबत देवेंद्र फडणवीसच अधिक व्यवस्थित सांगू शकतील असे महाजन म्हणाले आहे. महाजनांच्या गौप्यस्फोटानंतर खडसेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे? याची जोरदार चर्चा होत आहे.

Non Stop LIVE Update
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.