Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : आता नंबर कुणाचा ? नगरसेवकांना थोपवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न ? काय आहे प्लॅन ?

गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांपासून खासदार ते जिल्हा प्रमुख यांची गुवाहटी वारी सुरु आहे. त्यामुळे बंडाचे लोण आता नगरसेवकांना देखील लागते की काय अशी शंका गुरुवारपासून व्यक्त केली जात होती. खबरदारी म्हणून आता पक्षाच्या माध्यमातून नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 7 वाजता मुंबई महापालिकेतील सर्व नगरसेवकांना या बैठकीला उपस्थित रहावे लागणार आहे.

Shivsena : आता नंबर कुणाचा ? नगरसेवकांना थोपवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न ? काय आहे प्लॅन ?
मुंबई महापालिका Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 1:37 PM

मुंबई :  (Shivsena) शिवसेना आमदारांचे सुरु झालेले बंड हे काही थंड होण्याचे नाव घेत नाही. आमदारांपासून सुरु झालेले हे बंड थेट जिल्हा प्रमुखांपर्यंत येऊन ठेपले होते. त्यामुळे काय धरावे आणि काय सोडावे अशी अवस्था शिवसेना नेतृ्त्वाची झाली आहे. असे असले तरी आता डॅमेज कंन्ट्रोलसाठी खुद्द पक्ष प्रमुख (Udhav Thackeray) उद्धव ठाकरे हेच मैदानात उतरले असल्याचे चित्र शिवसेना गोठात पाहवयास मिळत आहे. (District Chief) जिल्हा प्रमुखांपाठोपाठ आता नगरसेवकांचा एकनाथ शिंदे गटात समावेश होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याच अनुशंगाने शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची बैठक ही शिवसेना भवनामध्ये होणार आहे. नगरसेवकांनी कोणती दुसरी भूमिका घेऊ नये म्हणून शिवसेनेने हे पाऊल उचलले आहे. शिवाय या बैठकीला नगरसेवकांना हे उपस्थित रहावेच लागणार आहे.

नेमकी काय भीती ?

गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांपासून खासदार ते जिल्हा प्रमुख यांची गुवाहटी वारी सुरु आहे. त्यामुळे बंडाचे लोण आता नगरसेवकांना देखील लागते की काय अशी शंका गुरुवारपासून व्यक्त केली जात होती. खबरदारी म्हणून आता पक्षाच्या माध्यमातून नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 7 वाजता मुंबई महापालिकेतील सर्व नगरसेवकांना या बैठकीला उपस्थित रहावे लागणार आहे. शिवाय कोणतेही कारण ऐकूण घेतले जाणार नाही. त्यामुळे बंडाबाबत आता शिवसेना नेतृत्व किती गंभीर झाले आहे याची प्रचिती येतेय.

संघटना मजबूतीकरणासाठी सर्वकश प्रयत्न

दिवसाकाठी शिवसेनेकडील आमदारांची संख्या ही घटत आहे. असे असताना संघटना मजबूतीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यानुसार जिल्हा प्रमुखांच्या बैठका पार पडल्यानंतर आता मुंबईतील नगरसेवकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कारण कोण केव्हा आपली भूमिका बदलेन हे सांगता येत नसल्याने किमान लोकप्रतिनिधींना आपलेसे करण्याची तयारी पक्षाकडून सुरु करण्यात आली आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे काय मार्गदर्शन करणार हे पहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील नगरसेवकांवरच लक्ष केंद्रीत

मुंबई ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून येथील नेतृत्वाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी या महापालिकेवर विशेष लक्ष राहणार आहे. शिवाय आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना नगरसेवकांचे बंड हे पक्षाच्या नुकसानीचे ठरणार आहे. असे असतानाच नगरसेवक हे शिंदे गटामध्ये सामील होऊ नयेत म्हणून आता योग्य ते प्लॅनिंग केले जात आहे. शुक्रवारी सायंकाळी पक्ष प्रमुख स्वत: नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.