रामानुजाचार्य यांच्याबद्दल बोलताना मोदींकडून बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख! यामागचा नेमका संदर्भ काय?
Statue Of Equality : रस्पविरोधी असणारे दोन विचार एका सूत्रात बांधण्याची किमया रामानुजाचार्य यांच्याकडे होती. सामान्य माणसांसोबत कठीणातला कठीण विचार जोडण्याची किमया रामानुजाचार्य यांच्याकडे होती, असंही मोदी म्हणालेत.
हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते संत रामानुजाचार्य यांच्या अतिशय भव्य अशा मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या या लोकर्पण सोहळ्यात मोदींनी संबोधित करताना रामानुजाचार्य यांच्या कार्याचा तर आढावा घेतलाच. शिवाय त्याचे विचारही किती अलौकिक आणि अमर होते, हे देखील आपल्या संबोधनात सांगितलं. विशेष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही रामानुजाचार्य यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामानुजार्चायांबाबात बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे, हे देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. समानतेचा संदेश देणाऱ्या संत रामानुजाचार्य (Ramanujacharya – Statue of Equality) यांच्या मूर्तीचा आणि आंबेडकर यांचा नेमका काय संबंध आहे, हे देखील जाणून घेणं महत्त्वाचंय.
नेमकं मोदी काय म्हणाले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं, की रामानुजाचार्य यांच्याकडून शिका. बाबासाहेब रामानुजाचार्य यांची प्रशंसा करायचे आणि त्यांच्याकडून शिका असा संदेश अनेकांना द्यायचे, असं मोदींनी आपल्या संबोधनात म्हटलंय. समानतेचा संदेश देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर रामानुजाचार्य यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते, असं मोदींनी म्हटलंय.
भारतातील जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद, अस्पृश्यता या सगळ्याच्याविरोधात बाबासाहेबांनी आपल्या उभ्या आयुष्यात लढा दिला होता. अनिष्ट चालीरीत, रुढी, परंपरा, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध बाबासाहेबांनी संघर्ष केला. समानतेचा संदेश देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आणि संत रामानुजाचार्य यांच्या समानतेच्या संदेशातील समान दुवा मोदींनी आपल्या संबोधनात नमूद केलाय.
जाती धर्म नव्हे, गुण महत्त्वाचे!
रामानुजाचार्य यांच्या ज्ञानाची भव्यता अत्यंत महत्त्वाची आहे, असं मोदींनी म्हटलंय. परस्पविरोधी असणारे दोन विचार एका सूत्रात बांधण्याची किमया रामानुजाचार्य यांच्याकडे होती. सामान्य माणसांसोबत कठीणातला कठीण विचार जोडण्याची किमया रामानुजाचार्य यांच्याकडे होती, असंही मोदी म्हणालेत.
Telangana | Prime Minister Narendra Modi inaugurates the 216-feet tall ‘Statue of Equality’ commemorating the 11th-century Bhakti Saint Sri Ramanujacharya in Shamshabad pic.twitter.com/dxTvhQEagz
— ANI (@ANI) February 5, 2022
रामानुजाचार्य यांनी ज्ञानाचीही दिशा दिली. तर भक्तीचा मंत्रही दिला. एक हजार वर्षांपूर्वी रामानुजाचार्य यांनी अंधश्रद्धा, जुन्या अनिष्ट चालीरीत यांच्या भींती मोडून पाड्या. दलित, मागासलेल्यांना जवळ केल. ज्या जातींबाबत भेदभाव केला जात होता, त्यांनी विशेष सन्मान रामानुजाचार्य यांनी दिला, असंही मोदींनी म्हटलंय. रामानुजाचार्य त्यांनी सांगितलं की, संसारात जातीने नाही, तर गुणांनी कल्याण होतं.
एकदा दुसऱ्या जातीतील एका मित्राचे अंतिम संस्कार केले. तेव्हा रामानुजाचार्य यांनी भगवान श्री रामाची आठवण करुन दिली. त्यांनी सांगितलं की भगवान राम जटायूचं अंतिम संस्कार करु शकतात, तर भेदभावाचा आधारा धर्म कसा असू शकतो, हा एक मोठा संदेश आहे, असंही मोदींनी म्हटलंय. अध्यात्मातून व्यवहार शिकवण्याचंही काम रामानुजाचार्य यांनी केलं, असंही मोदींनी म्हटलंय.
Statue of Equality will encourage youth. This statue of Ramanujacharya ji is a symbol of his knowledge, detachment, and ideals: PM Modi pic.twitter.com/clfSy6OG2k
— ANI (@ANI) February 5, 2022
संबंधित बातम्या :
Statue Of Equality: संत रामानुजाचार्यांचे विचार आजही जगाला मार्गदर्शक: नरेंद्र मोदी