लोकसभा निवडणुकीआधी देशाचा नेमका मूड काय? मोदींचीच जादू कायम की जनता राहुल गांधींकडे वळणार?

चार राज्यांचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. लोकसभेआधी देशाचा मूड काय आहे हे ही निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट होईल. पंतप्रधान मोदींचीच जादू कायम आहे? की राहुल गांधींकडे जनता वळतेय. याचा निकाल लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीआधी देशाचा नेमका मूड काय? मोदींचीच जादू कायम की जनता राहुल गांधींकडे वळणार?
PM NARENDRA MODI AND RAHUL GANDHI
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 11:31 PM

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी 3 डिसेंबरला लागणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरवात होईल. पण, लोकसभा निवडणुकीआधी देशाचा नेमका मूड काय आहे हे यातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान या निकालाआधी एक्झिट पोलनुसार विजयाचे दावे सुरू झाले आहेत. या चार राज्यांचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. लोकसभेआधी देशाचा मूड काय आहे हे ही निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट होईल. पंतप्रधान मोदींचीच जादू कायम आहे? की राहुल गांधींकडे जनता वळतेय. याचा निकाल लागणार आहे.

पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता येऊ शकते. एकूण 230 जागांपैकी कॉंग्रेसला 111 ते 121 जागांचा अंदाज आहे. भाजपला एकशे सहा, एकशे सोळा जागा मिळतील. तर इतरांना शून्य ते सहा जागा दाखवण्यात आल्या आहेत. 2018 मध्ये कॉंग्रसला 114 तर भाजपचे 109 आमदार निवडून आले होते.

मध्यप्रदेशात दोन हजार अठरामध्ये काँग्रेसचं सरकार आलं होतं. मात्र, दोन वर्षातच ऑपरेशन कमळमुळे काँग्रेसच्या कमलनाथ यांचं सरकार गेलं. मार्च 2020 मध्ये भाजपचे शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. आता पुन्हा भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारतीय जनता पार्टी बहुमत से जीतेगी. भाजपके प्रतीक प्रेम उनका प्रेम और विकास स्पष्ट बता देते की भारतीय जनता पार्टी भारी बहुमत से जितेगी. कॉंग्रेस के सभी कार्यकर्ता पुरी ताकद से मैदान मी आ जाये. भाजपा चुनाव की तयारी कर चुकी है. हम सब जीत के लिए तैयार है? हम सब एकजुट हैं? पण त्यामध्ये भाजप बाजी मारेल का? असे एक्झिट पोलचे आकडे सांगतायत.

राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतराची परंपरा आहे. 200 पैकी 199 जागांसाठी निवडणूक झाली. कॉंग्रेसला 90 ते 100 जागा मिळू शकतात. तर भाजप 100 ते 110 दहा आमदार जिंकू शकतात. इतरांना 5 ते 15 जागा दाखवण्यात आल्यात. 2018 मध्ये काँग्रेसने शंभर जागा जिंकल्या होत्या. तर, भाजपचे 73 आमदार निवडून आले होते. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये त्रिशंकू स्थितीचीही शंका आहे. कारण इथे भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षाचे ५० हून अधिक बंडखोर मैदानात आहेत. भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आघाडीवर असलेल्या वसुंधरा राजे यांनी निकालाआधी देवदर्शन सुरू केलंय. जयपूरच्या डोंगरी गणेश मंदिरामध्ये वसुंधरा राजे यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पुन्हा प्रचंड विजयाचा दावा करताहेत.

मोदी विरुद्ध राहुल गांधी असा प्रचार रंगलेलं आणखी एक राज्य म्हणजे छत्तीसगड. येथे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत. 2018 मध्ये काँग्रेसनं तब्बल ६७ जागा जिंकल्या. तर भाजचे अवघे 15 आमदार निवडून आले होते.

उलटफेर होण्याची शक्यता असणारे चौथं राज्य आहे तेलंगणा. तशी लढाई केसीआर आणि काँग्रेसमध्येच झाली. पंतप्रधान मोदी यांनी धुवांधार प्रचार करत बीआरएस आणि काँग्रेसवर हल्ले केले होते. काँग्रेस के विधायक कोई guarantee नही. अशी तिंक तय्म्नी केली. पण, तेलंगणामध्ये BRS आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढाई आहे. एकूण 119 जागांपैकी काँग्रेसचे 59 आमदार येऊ शकतात. बीआरएसचे 48 ते 58 आणि भाजपचे 5 ते 10 तर इतरांना 6 ते 8 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. 2018 मध्ये त्यावेळच्या टीआरएसला तब्बल 88 जागा मिळाल्या होत्या. तर कॉंग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी काँग्रेस करिष्मा करून केसीआर यांच्या बीआरएसला पराभूत करेल असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवतात. मात्र, वास्तव चित्र काहीच वेळात समोर येईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.