Gopichand Padalkar : लंकेंची लंका जाळायला अनेकजण तयार, पवारांमुळेच मला टार्गेट केले जात असल्याचा पडळकरांचा आरोप..!

चौंडी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी आहे. मध्यंतरी येथेच राजकारण केल्याचा प्रकार झाला होता. त्यामुळे तर अवघ्या 20 दिवसांमध्ये सत्तेतून पायउचार व्हावे लागले, एवढेच नाहीतर मी चौंडीत आल्यावर त्यांना पळून जावे लागले असल्याची आठवणही पडळकर यांनी करुन दिली आहे.

Gopichand Padalkar : लंकेंची लंका जाळायला अनेकजण तयार, पवारांमुळेच मला टार्गेट केले जात असल्याचा पडळकरांचा आरोप..!
आ. गोपीचंद पडळकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 6:30 PM

अहमदनगर :  (Gopichand Padalkar) भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे कायम चर्चेत असतात ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील टीकेवरुन. मात्र, हीच टीका अनेकांना झोंबली जात असल्याने आता ते देखील माझ्यावर वेगवेगळे आरोप करीत असल्याचे म्हणत त्यांनी (Nilesh Lanke) आ. निलेश लंके यांच्यावर टीका केली आहे. लंकेची लंका जाळायला अनेकजण तयार आहेत. त्यामुळे ज्याने-त्याने हिशोबात राहून आरोप करणे गरजेचे आहे. शिवाय असे आरोप करणाऱ्यांना आपण किंमतच देत नाही आणि पवार सोडून आपण टीका करण्यासाठीही खाली येत नसल्याचे पडळकर म्हणाले आहे.  जिल्ह्यातील पारनेर येथील ढवपुरी येथे झालेल्या सभेत (BJP Party) भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केलीये. तर यावरुच आता या दोन नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

आरोप-प्रत्यारोपाचे कारण काय?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची पारनेरातील ढवपुरी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी आ. निलेश लंके यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. रावणाची लंका ही एका हनुमानाने जाळली. तर या लंकेची लंका जाळायला येथे बरेच लोक आहेत. अशी खरमरीत टीका केल्यानंतर आ. लंके यांनीही जशाच तसे उत्तर दिले आहे. ज्यांनी मतदारसंघात आपले डिपॉझिट जप्त झाले आहे त्यांनी आगोदर मतदारसंघात लक्ष द्यावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. एवढेच नाहीतर त्यांचे खापराचे तोंड असते तर मागेच फुटले असते असेही लंके म्हणाले आहेत.

राजकारण केले म्हणून सरकार गेले

चौंडी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी आहे. मध्यंतरी येथेच राजकारण केल्याचा प्रकार झाला होता. त्यामुळे तर अवघ्या 20 दिवसांमध्ये सत्तेतून पायउचार व्हावे लागले, एवढेच नाहीतर मी चौंडीत आल्यावर त्यांना पळून जावे लागले असल्याची आठवणही पडळकर यांनी करुन दिली आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि आ. निलेश लंके यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत असले तरी त्याला निमित्त मात्र, शरद पवारांचेच आहे.

म्हणून माझ्यावर टीकास्त्र..

राज्यात जातीय राजकारण ज्यांनी केले त्यांच्यावरच आपण सातत्याने टीका केली आहे. त्यामुळेच आता इतर राष्ट्रवादीचे नेतेही आपल्यालाच लक्ष करीत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. असे असले तरी आरोप करणाऱ्यांना आपण किंमतच देत नाही आणि पवार सोडून आपण टीका करण्यासाठीही खाली येत नाही हे देखील त्यांनी सांगितले आहे.

पडळकरांनी मतदारसंघात लक्ष द्यावे…

उठ-सूट आरोप करण्यासाठीच काहीजणांना पक्षाने सांभळले आहे, त्यापैकी एक म्हणजे पडळकर.. मतदारसंघात आपले डिपॉझिट जप्त होते आणि आरोप मात्र, शरद पवार यांच्यावर करतात. त्यामुळे अशा आरोपांचा ना जनतेवर परिणाम होतो ना त्या व्यक्तिमत्वावर, उलट त्यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर द्यायचे म्हणजे आपला वेळ वाया घालवल्यासारखे असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.