सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीसाठी सरकारची काय तयारी? मराठा समाजाला सांगा- विनायक मेटे
मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर जबाबदारी सोपवली पण त्यांनी सत्यानाश केला, अशी टीका मेटे यांनी केली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सुनावणीसाठी राज्य सरकारने काय तयारी केली आहे? असा प्रश्न विचारल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. या सुनावणीबाबत मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीबाबत राज्य सरकार जबाबदारी घेणार का, हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर जबाबदारी सोपवली पण त्यांनी सत्यानाश केला, अशी टीका मेटे यांनी केली आहे.(Vinayak mete questions to state government on hearing of Maratha reservation)
दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. त्यात हा विषय मांडून मराठा आरक्षण टिकवण्याचं काम राज्य सरकारनं करावं, समाजाला त्याबाबत सांगावं, ही माराठा समाजाची मागणी असल्याचंही विनायक मेटे म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारीला सुनावणी होणार होती. मात्र ती दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली. त्यावर सुनावणी का पुढे ढकलली गेली? महाविकास आघाडी सरकार काय गोट्या खेळतंय का? असा संतप्त सवाल विनायक मेटे यांनी विचारला होता.
नोकरभरती पुढे ढकला
यावेळी मेटे यांनी मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत नोकरभरती पुढे ढकलण्याची मागणी केली. तसेच कोर्टात अर्ज सादर करणाऱ्या एमपीएससीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. एमपीएससीचा भरती विरोधातील अर्ज ही जातीयवादी भूमिकाच आहे. मराठा समाजात सरकारच्या धोरणांवर असंतोष आहे, असंही त्यांनी सांगितलं.
अशोक चव्हाणांवर नरेंद्र पाटलांचाही हल्लाबोल
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेवू नये, चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाला खूप त्रास झाला, असा घणाघात नरेंद्र पाटील यांनी केलाय. ते सोमवारी जालन्यात बोलत होते. अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेवू नये. अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाला खूप त्रास झाला. चव्हाण यांनी राजीनामा तर द्यावाच पण त्यांच्या 5 पिढ्यांनी राजकारणात येऊ नये. मागच्या सरकारने मराठा समाजासाठई सुरु केलेल्या सवलतीही महाविकास आघाडी सरकारनं बंद केल्या, अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आता राज्यभरात आंदोलन तीव्र करु, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
Video | Aurangabad | औरंगाबादेत चैन स्नॅचरचा धुमाकूळ, रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्धाची चैन लांबवली #Aurangabad pic.twitter.com/9hgqcOxSti
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 4, 2021
संबंधित बातम्या :
सरकारचा मोठा निर्णय, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार, वाचा सविस्तर
एमपीएससीला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकारच नाही; मराठा आरक्षणाचा वाद चिघळणार?
Vinayak mete questions to state government on hearing of Maratha reservation