राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उज्ज्वल निकम म्हणतात…

अहमदनगर : राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. यात महत्वाची घडामोड म्हणजे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम राष्ट्रवादीकडून जळगावातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. उज्ज्वल निकम राष्ट्रवादीतून निवडणुक लढवणार असल्याने सध्या राजीकय वर्तुळात एकच खळबळ माजली असल्याचे दिसतय. यावर त्यांना विचारलं असता त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. अहमदनगरमध्ये त्यांना यावर प्रश्न विचारण्यात आला […]

राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उज्ज्वल निकम म्हणतात...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

अहमदनगर : राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. यात महत्वाची घडामोड म्हणजे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम राष्ट्रवादीकडून जळगावातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. उज्ज्वल निकम राष्ट्रवादीतून निवडणुक लढवणार असल्याने सध्या राजीकय वर्तुळात एकच खळबळ माजली असल्याचे दिसतय. यावर त्यांना विचारलं असता त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. अहमदनगरमध्ये त्यांना यावर प्रश्न विचारण्यात आला होता.

दरम्यान निकम यांचं मौन सूचक आहे. कारण, त्यांनी स्पष्टीकरण दिलं नसलं तरी निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेचं खंडणही केलं नाही. त्यामुळे जळगावातून निकमांची उमेदवारी निश्चित झाली असल्याच्या चर्चेला आणखी बळ मिळालंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे. नक्कीच उज्ज्वल निकम निवडणूक रिंगणात राष्ट्रावदीकडून उतरणार का? या प्रश्नाचे उत्तर येत्या निवडणुकीत समोर येईल.

नगरसाठी राष्ट्रवादीकडून तीन नावं

दरम्यान काल झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी तीन नावांवर चर्चा झाली. यामध्ये माजी आमदार दादाभाऊ कळमकर, नरेंद्र घुले पाटील आणि प्रतापराव ढाकणे ही नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली. एकीकडे राष्ट्रवादीने तीन नावं निश्चित केली असली, तरी काँग्रेसही या जागेसाठी इच्छुक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा 48 पैकी 40 जागांचा तिढा सुटला आहे. मात्र 8 जागांचा तिढा कायम आहे, यामध्ये नगरच्या जागेचाही समावेश आहे.

अहमदनगरसाठी काँग्रेस इच्छुक

अहमदनगरची जागा सध्या राष्ट्रवादीकडे असली तरी तिथे विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पारंपारिक मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादीही या जागेसाठी आग्रही आहे.

अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी-भाजप युती

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळालं. कारण सासरे शिवाजी कर्डिलेंना जावई राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी मदत केली.

संबंधित बातम्या 

नगरसाठी राष्ट्रवादीचा आग्रह, तीन नावं निश्चित 

त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!  

लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित  

अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.