Eknath Shinde : सरनाईक अन् मुख्यमंत्र्यामध्ये मतभेदाच्या चर्चेला उधाण, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया काय?
प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतभेद झा्ले आहेत यावर लवकर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतक्रिया समोर आली असून शिंदे गटातील धूफूसही बाहेर येणार का हे पहावे लागणार आह.
ठाणे : शिंदे सरकारची (State Government) स्थापना होऊन तीन महिने उलटत आहे. या सरकारमध्येही सर्वकाही अलबेल असे नाही. कोणी मंत्रीपदावरून नाराज तर कोणी पालकमंत्र्यांच्या निवडीवरुन. आता मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि जिल्ह्यातीलच प्रताप सरनाईक आणि त्यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहेत. यातच प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या मुलाने ‘दो दिल एक जान है हम्म’ असे ट्विट केल्याने काहीतरी बिनसले असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका वाक्यात उत्तर दिले अन् विषयच मिटवला. आम्ही दोघे बरोबरच आहोत, हे तुम्ही पाहत असताना कसले मतभेद? असे म्हणून त्यांनी सर्वकाही अलबेल असल्याचे सांगितले पण सरनाईकांचे हावभाव काही औरच सांगत होते.
नेमके प्रकरण काय?
ठाण्यातील ओवळा माजिवाडा हा शिवसनेचा मतदारसंघ आहे. तो आपल्याकडेच कायम रहावा अशी मागणी प्रताप सरनाईकांनी केली आहे. पण हा मतदार संघ नाईकांनी सोडावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. त्यावरुन हे मतभेद वाढत गेले आहेत.
प्रताप सरनाईकांकडून हा मतदार संघ सोडवून घ्यायचा आणि भाजपला द्यायचा, यावरुन मतभेद सुरु झाले आहे. परंपरागत मतदार संघ भाजपाकडे कशाला असा सवाल आता कार्यकर्त्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शिंदे गटातही धूसफूस ही सुरुच आहे.
प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री यांच्यातील मतभेदाची बातमी राज्यभर होऊ लागल्याने सरनाईकांचा मुलगान पूर्वेश सरनाईक यांनी एक पोस्ट ट्विट केली होती. यामध्ये प्रताप सरनाईक आणि मुख्यंत्री हे एक दिल आणि एक जान असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचे काम केले जात आहे.
ओवाळा माजिवाडा हा मतदारसंघ भाजपाच्या माजी आमदारकीसाठी सोडावा, असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरला होता. त्यावरुन प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला होता. पण असे काही नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सांगितले आहे.