Pune : संतोष बांगर ताफ्यावरील हल्ला प्रकरणी शिंदे गटाची पहिली प्रतिक्रीया काय?
आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर आता राज्याचे राजकारण तापत आहे. हल्ल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रीया आली आहे. त्यानंतर आता काय होईल हे पहावे लागणार आहे.
योगेश बोरसे टीव्ही 9 प्रतिनीधी पुणे : आ. संतोष बांगर हे अमरावती (Amravati District) जिल्ह्यामध्ये दाखल होताच अंजनगाव सुर्जीमध्ये संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. आता या प्रकरणावरुन राज्याचे राजकारण (Politics) तापणार असे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात घाणरडे राजकारण सुरु झाले असून हे वेळीच बंद होणे गरजेचे आहे. हा प्रकार घडला असेल तर संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा (Uday Samant) उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. या हल्ल्यावरुन पुन्हा राज्यातील राजकारण तापणार असेच चित्र निर्माण झाले आहे. संतोष बांगर हे अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल होताच अंजनगाव सुर्डी येथे शिवसैनिकांनी 50 खोके एकदम ओके असे म्हणत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता.
अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीकास्त्र केले होते. यावरुन उदय सामंत यांनी अंबादास दानवे यांना खोचक टोला लगावला आहे. दानवे एवढे कधी मोठे झाले ते थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीका करु लागले असे म्हणत उत्तर देणे टाळले आहे.
पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर राज्यात नाराजीचे चित्र आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच यावरुन नाराजी झाली आहे. मात्र, नाराजीच्या अशा घटना घडलेल्याच नाही. एखाद्याकडे दोन जिल्ह्याचे पालकत्व असले तर त्यामध्ये नाराजीचे काय? असे उदय सामंत म्हणाले आहेत.
ठाण्याच्या पालकमंत्री निवडीवरुन भाजपाच्या नगरसेवकाने थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केले आहे. मिस्टर गुवाहाटी…काही तरी सोडा भूमिपुत्रांसाठी, नाही तर परत लढावं लागेल आमच्या अस्मितेसाठी अशी फेसबुक पोस्ट भाजपाचे माजी नगरसेवक मंदार टावरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यावर अशी टीका कोण करीत असेल तर ते योग्य नसल्याचे सामंत म्हणाले आहेत.
मेडिकल डिव्हाईस प्रकल्पांतर्गत राज्यातील रुग्णालयामध्ये लागणाऱ्या उपकरांची निर्मिती होणार होती. हा प्रकल्प औरंगाबादमध्ये उभारण्यात आला होता. मात्र, त्याचे काय झाले हे आता शिंदे गटाकडून आणि भाजपाकडून विचारले जात आहे.