Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचे नेमके काय होणार? ज्याची चर्चा तसेच दानवेंचे संकेतही..!

अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घेऊन मोठे विधान केले होते. त्यांच्या विधानामुळे शिंदे गट आणि भाजप स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये एकत्र लढणार की नाही अशी चर्चा सुरु झाली होती.

Jalna : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचे नेमके काय होणार? ज्याची चर्चा तसेच दानवेंचे संकेतही..!
खा. रावसाहेब दानवे
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 4:02 PM

जालना : दोन दिवसांपूर्वीच कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपल्या मनातील खदखद ही बोलून दाखवली होती. राज्याच्या राजकारणात ठीक आहे पण स्थानिक पातळीवर (Local Election) भाजपाला घेऊन निवडणूका लढवता येतील का नाही याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली होती. यावर आता खा. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाई…भाई म्हणून जमलं तर ठीक नाहीतर मग कुस्ती ही ठरलेलीच असल्याचे म्हणत आपणही दंड थोपटून लढण्यासाठी तयार असल्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये त्यांचे प्राबल्य अधिक आहे. त्यामुळे या निवडणूकांमध्ये भाजपला बरोबर घेऊन लढण्यापेक्षी मैत्रीपूर्ण निवडणुका लढवाव्यात असा सूर उमटत आहे. त्यामुळे राज्यात जरी सर्व काही अलबेल असले तरी स्थानिक पातळीवर होईलच असे नाही, हेच संकेत सत्तारांनी दिले होते.

अब्दुल सत्तार यांचा उद्देश आणि मानस हा आपल्या लक्षात आल्याचे खा. रावसाहेब दानवे यांनी म्हणले आहे. भाई..भाई म्हणून जमलं तर ठीक नाहीतर मग कुस्ती तर ठरलेलीच आहे. रावसाहेब दानवेंच्या या प्रतिक्रयेनंतर शिंदे गट आणि भाजपामध्येही सर्वकाही अलबेल आहेच असे नाही.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घालत आहेत. मात्र, या ठिकाणच्या निवडणुकीत चित्र हे वेगळे पाहवयास मिळणार की काय असे संकेतच अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. स्थानिक पातळीवरील स्थिती पाहता त्यांनी ही भूमिका घेतली असली तरी रावसाहेब दानवेंनी त्यांना जशाच तसे उत्तर दिले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा, बैठका ह्या होतीलच. पण यामध्येही मधला मार्ग निघाला नाहीतर मग कुस्ती खेळायला आपणही तयारच आहोत. त्यामुळे निवडणुका कोण निकाली काढतंय हे देखील पाहणे महत्वाचे आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरही खा. रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचेही भाषण ऐकणार असल्याचे म्हणाले आहेत. एवढेच नाहीतर लक्षपूर्वक ऐकणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.