Viral Audio :’उद्धव ठाकरे देवमाणूस’ मग बंडखोरांची खदखद काय..? आ. शहाजी बापूंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

बंडाची सुरवात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झाली असली तरी सुरतेला पहिले पाऊल लागले ते आ. शंभूराजे देसाई आणि शहाजी बापू पाटील यांचे. त्यामुळे सुरतेची लढाई ही जिंकल्यात जमा आहे. दिवसेंदिवस नाराज आमदारांची संख्या वाढत आहे. आमदारांच्या मनातील खदखद आता स्पष्टपणे बाहेर येत आहे.

Viral Audio :'उद्धव ठाकरे देवमाणूस' मग बंडखोरांची खदखद काय..? आ. शहाजी बापूंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
सा्ंगोला मतदार संघाचे आमदार शहाजी बापू पाटील
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:17 AM

मुंबई :  (Shivsena) शिवसेनेतील बंडखोर आमदार हे गुवाहटीमध्ये असले तरी आपल्या मतदार संघामध्ये काय सुरु आहे याची उत्सुकता त्यांना आहेच. हे सांगायचे कारण की गुवाहटीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असतानाही सांगोला मतदार संघात काय सुरुयं हे जाणून घेण्यासाठी (Shahaji Patil) आ. शहाजी बापू पाटलांनी आपल्या कार्यकर्त्याला फोन लावला आणि त्याचीच ऑडिओ क्लिप सध्या राज्यभर व्हायरल होतेय. कार्यकर्त्यासोबत राजकीय नेता किती मनमोकळा संवाद साधू शकतो हेच यामधून दिसून येते. शिवाय शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंबद्दल आमदारांचे काय म्हणणे आहे. शिवाय त्यांच्याबद्दल आमदारांच्या काय भावना आहेत याचा लेखाजोखाच मांडला आहे. त्यामुळेच ही क्लिप जो तो कान देऊन ऐकत आहे. आजही उद्धव ठाकरे यांनाच आमदार हे देवमाणूस मानत आहेत. मात्र, महाविकास आघाडीमध्ये होत असलेल्या घुसमटीमुळे ही वेळ आल्याचे आ. शहाजी पाटील यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे देवमाणूस पण..

नाराज आमदारांनी बंड केले असले तरी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही प्रत्येक आमदाराच्या मनात आदर हा कायम आहे. आजही ते प्रत्येकासाठी देवमाणूस आहेत. पण हे असेच राहिले तर मात्र, आम्ही जगत नाही ही सगळ्यांची अडचण आहे. अडीच वर्षात आमच्या आमदारकी आणि मतदारसंघ सुध्दा राष्ट्रवादी ताब्यात घेतंय म्हणून प्रत्येकाच्या मनात भीती आहे. त्यामुळेच नेतृत्वाला आव्हान देणारं हे बंड उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

अन् सुरतेची लढाई जिंकल्यात जमा

बंडाची सुरवात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झाली असली तरी सुरतेला पहिले पाऊल लागले ते आ. शंभूराजे देसाई आणि शहाजी बापू पाटील यांचे. त्यामुळे सुरतेची लढाई ही जिंकल्यात जमा आहे. दिवसेंदिवस नाराज आमदारांची संख्या वाढत आहे. आमदारांच्या मनातील खदखद आता स्पष्टपणे बाहेर येत आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आता सर्वच आमदारांनी मान्य केले आहे. त्यामुळे सुरतेची लढाई जिंकली असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याला सांगितले आहे.

काय आहे बंडखोर आमदारांच्या मनात?

बंडाच्या अगदी सुरवातीपासून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीबरोबर घरोबा नको ही भूमिका घेतलेली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले होते. तीच भावना इतर सर्व बंडखोर आमदारांची आहे. हिंदूत्वाचा मुद्दा असला तरी महाविकास आघाडीबरोबर युती ठेवल्यास पक्षाचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे आपल्या मतदार संघात घुसखोरी करणार ऐन निवडणुकीत सर्वच पक्षांनी वेगळी चूल मांडली तरी राष्ट्रवादी पक्ष हा मतदार संघच हायजॅक करेल अशी भीती प्रत्येक आमदाराला होती. असे आ. शहाजी बापू पाटलांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.