Loksabha Election 2024 | सुरवात राहुल गांधी तर समारोप नरेंद्र मोदी करणार, देशातील हॉट सीटची परिस्थिती काय?
गेल्या निवडणुकीत अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांचा झालेला पराभव ही सर्वात मोठी बातमी होती. याशिवाय पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या जागेनेही लक्ष वेधले होते.
नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. आयुक्त यांच्या घोषणेमुळे देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. प्रत्येक पक्षाने जागा जिकण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपने आपल्या विद्यमान उमेदवारांना डावलून नवे उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल केली आहे. कॉंग्रेसने मात्र जुन्याच नेत्यांवर विश्वास दाखविला आहे. मात्र, काही जागा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्टेच्या आहेत. सात टप्प्यात मतदान होणार असल्याने या हॉट सीटही आता चर्चेत आल्या आहेत.
देशात सात टप्प्यांत निवडणुका होत असताना काही ठिकाणे प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केल्या तारखांनुसार संपूर्ण निवडणूक 7 टप्प्यात होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. तर, 1 जून रोजी अखेरचा टप्पा पार पडणार आहे. देशात एकूण 43 दिवस निवडणुकीचा माहोल असणार आहे. 4 जून रोजी देशात नवीन सरकार सत्तेत येणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे रोजी आणि सातवा टप्पा 1 जून रोजी होईल. निवडणुकीच्या तारखांनंतर मतदान केव्हा आणि कोणत्या तारखेला होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्याचबरोबर हॉट सिट ठरलेल्या बड्या जागांवरही लोकांची नजर आहे.
गेल्या निवडणुकीत अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांचा झालेला पराभव ही सर्वात मोठी बातमी होती. याशिवाय पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या जागेनेही लक्ष वेधले होते. यंदाही या दोन जागा महत्वाच्या आहेतच याशिवाय अन्य काही महत्वाच्या जागांकडे देशाचे लक्ष लागेलेले असेल.
देशात सात टप्प्यात होणाऱ्या मतदानाची सुरवात राहुल गांधी करणार आहेत त्याचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. म्हणजेच राहुल गांधी हे निवडणूक लढवीत असलेल्या यांच्या वायनाड मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात काँग्रेस नेत्याच्या नशिबाचा बॉक्स ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात निवडणुकीचा अखरेचा सातवा टप्पा असेल. येथे 1 जून रोजी मतदान होणार आहे.
19 एप्रिल 2024 – राहुल गांधी ( कॉंग्रेस – वायनाड)
19 एप्रिल 2024 – शशी थरूर ( कॉंग्रेस – तिरुवनंतपुरम)
19 एप्रिल 2024 – कमलनाथ (कॉंग्रेस – छिंदवाडा)
19 एप्रिल 2024 – नितीन गडकरी (भाजप – नागपूर)
19 एप्रिल 2024 – तरुण गोगोई ( जोरहाट, आसाम)
26 एप्रिल 2024 – भूपेश बघेल ( कॉंग्रेस – राजनांदगाव, छत्तीसगड)
26 एप्रिल 2024 – अमित शहा (भाजप – गांधी नगर )
26 एप्रिल 2024 – वैभव गेहलोत ( कॉंग्रेस – जालोर, राजस्थान)
07 मे 2024 – शिवराज सिंह चौहान (भाजप – विदिशा)
07 मे 2024 – ज्योतिरादित्य सिंधिया (भाजप – गुणा)
07 मे 2024 – सुप्रिया सुळे (शरद पवार गट – बारामती)
20 मे 2024 – स्मृती इराणी (भाजप – अमेठी)
20 मे 2024 – राजनाथ सिंह (भाजप – लखनौ)
20 मे 2024 – पियुष गोयल (भाजप – मुंबई उत्तर)
1 जून 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी (भाजप – वाराणसी)