“अजित पवारांसोबत आम्ही सरकार स्थापन केलं, त्यावेळी जेव्हढी ताकद लावली, ती आता का नाही?”
मराठा आरक्षणाकडे ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलं. आम्ही अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर न्यायालयात मोठी ताकद लावली तितकी सुद्धा इथे लावली नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
इस्लामपूर (सांगली) : ठाकरे सरकारने (Thackeray Sarkar) जेवढी ताकद आम्ही अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सरकार स्थापन केल्यानंतर कोर्टात लावली, तेव्हढी ताकद मराठा आरक्षणासाठी लावली नाही, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) इथे बोलत होते. (When BJP formed the government with Ajit Pawar that time Thackeray sarkar fight with full force but why not in Maratha reservation ask Chandrakant Patil )
मराठा आरक्षणाकडे ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलं. आम्ही अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर न्यायालयात मोठी ताकद लावली तितकी सुद्धा इथे लावली नाही. अभ्यासासाठी तज्ज्ञांची गरज भासते, या विषयात चालढकल चालली आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
जे OBC ला ते मराठ्यांना हे सूत्र अवलंबायला तुमची अडचण काय हे सरकारने समोर येऊन स्पष्ट करावं, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला दिला.
राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 1 कोटी पत्र लिहिण्याचा उपक्रम घेतलाय, किती हा मूर्खपणा चाललाय?. शरद पवारांनी 1 कोटी पत्र उद्धव ठाकरेंना लिहायला सांगायला पाहिजेत, कदाचित पत्ता चुकला असावा, म्हणून मोदींना पत्र लिहिली जात आहेत, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.
संभाजीराजेंना भाजप खासदार मानतो
संभाजीराजे मान्य करत नसले तरी आम्ही त्यांना भाजपचे खासदार मानतो. ऑन पेपर तसं सांगतांत. लोकप्रतिनिधींना जाब विचारुन प्रश्न सुटणार आहे का बाबा, वाट बघणार आहात की वाट लागण्याची वाट पाहणार आहात? या विषयात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, आंदोलनात कोणी चाल ढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असा इशारा यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिला.
संबंधित बातम्या
“प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, पेशवाईला फटका”
मंत्र्यांचे आजोबा-पणजोबाही वारीला जातात, वारीचा निर्णय विचार करूनच: छगन भुजबळ