देवेंद्र फडणवीस, तुम्हाला राग केव्हा येतो? पत्रकारांनी ऑफ द रेकॉर्ड प्रश्न विचारताच, म्हणाले…
देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच सांगितलं, नेमका त्यांना राग केव्हा येतो? जाणून घ्या, काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : दिवाळीनिमित्त (Diwali) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील पत्रकारांसोबत अनौपचारीक बातचीत केली. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासोबत सध्याच्या राजकीय वातावरणावरही (Maharashtra Politics) आपलं मत व्यक्त केलं. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना नेमका राग केव्हा येतो, या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तरही खास होतं.
केव्हा येतो राग?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमका राग केव्हा येतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मला तेव्हाच राग येतो, जेव्हा मला खूप भूक लागलेली असते. अगदी खेळीमेळीच्या वातावरण पत्रकारांसोबत फडणवीस यांना चर्चा केली. पत्रकारांच्या काही ऑफ दी रेकॉर्ड प्रश्नांवरही फडणवीस यांनी आपलं मत यावेळी व्यक्त केलं.
पाहा व्हिडीओ
मी सागर बंगल्यावर खूष आहे, इथं खूप पॉझिटिव्हीटी आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. माझ्याकडे खूप सहशीलता आहे, हे गेल्या 25 वर्षांत तुम्ही पाहिलं असेलच, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काम करणाऱ्या धडाकेबाज स्टाईलवरही फडणवीसांनी महत्त्वाचं विधान केलं. मुख्यमंत्री शिंदे नेमकं झोपतात केव्हा, हा खरंतर संशोधनाचा विषय आहे, असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, राज्यमंत्री लवकर केले नाहीत, तर त्रास हा होतोच, असंही त्यांनी म्हटलं. सध्याच्या राजकीय वातावरणात कटुता वाढली आहे, हे वास्तव असल्याचंही ते म्हणाले. विशेष म्हणजे दिवाळी अंकाबाबतही फडणवीसांनी खोचक विधान केलं. ज्या दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल चांगलं लिहिलेलं असतं, तोच दिवाळी अंक मी वाचतो, असंही त्यांनी यावेळी पत्रकारांना उद्देशून म्हटलं.