आमच्या हातात ईडी, सीबीआय येईल तेव्हा त्यांचा पक्ष… संजय राऊत यांचा गंभीर इशारा काय ?
लोहा लोहे को काटता हे त्यांनाच माहीत आहे असं नाही, आम्हालाही माहीत आहे. आमच्या हातात जेव्हा ईडी, सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल अशा शब्दांत शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला.
मुंबई | 18 मार्च 2024 : लोहा लोहे को काटता हे त्यांनाच माहीत आहे असं नाही, आम्हालाही माहीत आहे. आमच्या हातात जेव्हा ईडी, सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल अशा शब्दांत शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंभीर इशारा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी परिवार वादावरून जे वक्तव्य केलं, त्याला प्रत्युत्र देताना संजय राऊत यांनी त्यांना थेट सुनावलं.
“ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावं. त्यावेळी भारतीय जनता पक्ष शिल्लक राहिला नसेल.लोहा लोहे को काटता है, हे आम्हालाही माहिती आहे. फक्त त्यांनाच माहित आहे असं नव्हे. ज्या दिवशी आमच्या हातात ईडी-सीबीआयसह सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा” असं संजय राऊत म्हणाले.
भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार पार्टी
यावेळी राऊत यांनी भाजपवार कडाडून हल्ला चढवला. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार पार्टी आहे. भ्रष्टाचाराला समर्पण देणारी पार्टी आणि भ्रष्टाचारी काम करणारी पार्टी, ही भाजपची ओळख आहे. त्यांनी आरशात बघितलं तर त्यांना फक्त भ्रष्टाचार दिसणार, अशी टीका राऊत यांनी केली.
भाजपने दुसऱ्यांचे पाळणे हलवू नयेत..
यावेळी त्यांनी भाजपमधील विविध पक्षांच्या इनकमिंगवरूनही टीका केली. भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोर पळवणारा पक्ष आहे, त्यांच्याकडे स्वतःची पोर नाहीत. ते सर्व आमची फोडलेली पोर घेऊन ते बसले आहेत. भाजपाने स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवावेत, दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालवू नका, नाहीतर ते पुन्हा पळून जातील, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.
रामटेकची जागा काँग्रेसला निश्चित
या पत्रकार परिषदेत संजय राऊत हे आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबद्दलही बोलले. जागावाटप संपलेले आहे. नेहरू सेंटर मध्ये आम्ही ज्येष्ठ नेते आम्ही सर्वजण होतो. फायनल कागद तयार झाला, त्यामध्ये रामटेकची जागा ही काँग्रेसला निश्चित झालेला आहे. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेना कडे राहील. कोल्हापूर ही आमची सिटींग जागा आहे. चंद्रहार पाटील उमेदवार घोषित केले आहे. ही सिटींग जागा आमची डबल महाराष्ट्र केसरी यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे, असे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकरांबरोबर काँग्रेस चर्चा करत आहे. ते कालच्या सभेला आले होते ही सकारात्मक गोष्ट आहे, असेही राऊत म्हणाले.