‘अहो पडळकर, जनसंघाचे दोन खासदार असतानाही तुम्ही लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयींना महान म्हणायचात ना?’
दुसऱ्याला बोट दाखविताना स्वतः कडे चार बोटं येतील ध्यानात ठेवा, असे खरात यांनी पडळकरांना सुनावले. | Sachin Kharat
मुंबई: भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांच्या संख्येचा दाखला देत शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. या वादात आता आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात (Sachin Kharat) यांनी उडी घेतली आहे. जनसंघाचे दोन खासदार असताना तुम्ही लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयींना महानच म्हणायचात ना, असा प्रतिप्रश्न खरात यांनी गोपीचंद पडळकर यांना विचारला आहे. (Sachin Kharat take a dig at bjp leader Gopichand Padalkar)
सचिन खरात सोमवारी मुंबई प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. गोपीचंद पडळकर, तुमच्या पूर्वीच्या जनसंघाचे दोन खासदार होते तरीही तुम्ही माननीय लालकृष्ण अडवाणी यांना लोहपुरुष आणि माननीय अटलबिहारी वाजपेयी यांना महान नेता म्हणत होता. त्यामुळे खासदारांच्या संख्येवर कोणत्याही नेत्यांची उंची मोजता येत नाही. दुसऱ्याला बोट दाखविताना स्वतः कडे चार बोटं येतील ध्यानात ठेवा, असे खरात यांनी पडळकरांना सुनावले.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारला होता. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असं म्हणत त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता.
राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे- चंद्रकांत पाटील
पुण्यातील एका मेळाव्यात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका केली होती. “राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी एका मेळाव्यात केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते.
संबंधित बातम्या:
भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही: चंद्रकांत पाटील
शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हेंची चंद्रकांतदादांवर टीका
(Sachin Kharat take a dig at bjp leader Gopichand Padalkar)