मी ब्लू फिल्म करत नाही : राज ठाकरे
'ब्लू प्रिंट' हा शब्द उच्चारताना पत्रकार चुकला आणि 'ब्लू फिल्म' असं बोलून गेला. राज ठाकरेंनी हाच धागा पकडला आणि 'मी ब्लू फिल्म करत नाही' असं हसत उत्तर दिलं.
मुंबई : प्रचारसभांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची फटकेबाजी नवीन नाही. अगदी मुख्यमंत्र्यांना ‘पोपट कसा दिसला?’ असा द्वयर्थी प्रश्न विचारण्यापर्यंतही राज ठाकरेंची मजल गेली होती. त्यातच आता ‘मी ब्लू फिल्म करत नाही’ (Raj Thackeray MNS) अशी मिश्किल टिपणी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली. निमित्त ठरली ती पत्रकाराने प्रश्न विचारताना केलेली गफलत.
राज ठाकरे यांना पत्रकारांनी किती जागा लढवणार, प्रचारसभा कुठे कुठे घेणार, ब्लू प्रिंटचं काय असे धडाधड प्रश्न विचारले. ‘ब्लू प्रिंट’ हा शब्द उच्चारताना पत्रकार चुकला आणि ‘ब्लू फिल्म’ असं बोलून गेला. राज ठाकरेंनी हाच धागा पकडला आणि ‘मी ब्लू फिल्म करत नाही’ असं हसत उत्तर दिलं. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
राज ठाकरेंची धडाकेबाज एण्ट्री, सलामीलाच विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर
मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील (Dharma Patils son Narendra Patil) यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत (Raj Thackeray MNS) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. याशिवाय नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हे सुद्धा मनसेत दाखल झाले. यावेळी राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील अशी आशा होती, मात्र त्यांनी पुढचा प्लॅन न सांगता जाता जाता फटकेबाजी केली.
राज ठाकरे यांनी पाच ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं सांगितलं. किती उमेदवार लढणार हे लवकरच जाहीर करेन, रोज चार-पाच नावं जाहीर करेन, असं ते म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, “कैलासवासी धर्मा पाटील, आपल्याला कल्पना असेल, त्यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहेत. आपल्या पक्षातर्फे ते निवडणूकही लढवणार आहेत. याशिवाय नाशिकचे नगरसेवक दिलीप दातार यांनीही मनसेत प्रवेश केला. ते देखील मनसेतर्फे निवडणूक लढवतील. आता मी रोज चार-पाच नावं सांगत जाईन”.
पत्रकारांनी राज ठाकरेंना तुमच्या पक्षातही इनकमिंग सुरु झाली आहे का? असा प्रश्न केला. त्यावर राज ठाकरे आपल्या शैलीत म्हणाले फोन सध्या चालू आहेत. नेमक्या किती जागा लढणार हे योग्य वेळी सांगेन. आजच्या पक्षप्रवेशासाठी मीडियाला बोलावलं आहे, पत्रकार परिषदेसाठी नाही.’ असं स्पष्ट केलं.
पाहा व्हिडिओ :