Ashok Chavhan : स्वकीयांनी डावलले, तिथे अशोक चव्हाणांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले , नेमंक घडलं तरी काय?
राजकीय नाट्यानंतर राज्यात सत्तांतर होताच प्रस्तावित कामांना ब्रेक देण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी नाशिकमध्ये असाच प्रकार घडला असताना आता नांदेडमध्येही बुधवारीच रस्त्याच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. रस्त्यांच्या कामांचे टेंडर राज्य सरकारने थांबवले आहे. एकीकडे विकासासाठी सर्वकाही असे भासवले जात असले तरी विकास कामातही राजकारण केले जात असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.
मुंबई : बंडखोर आमदारांनी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केले असले तरी अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचे आभार तेही कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने मानले आहेत. त्यामुळे नेतृत्वावर सवाल उपस्थित करणाऱ्यांसाठी हा मोठी धडा असेल. ते देखील एकी काळी मुख्यमंत्री पदी राहिलेल्या (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दमध्ये जेवढी कामे झाली नाहीत तेवढी कामे गेल्या अडीच वर्षात झाली असल्याचे ते म्हणाले आहेत. एकीकडे निधी मिळत नसल्याचा ठपका (Rebel MLA) बंडखोर आमदारांनी ठेवला आहे तर दुसरीकडे मित्र पक्षातील नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांचे अशा प्रकारे कौतुक होत आहे. शिवाय मुंबई-जालना-नांदेड अशी बुलेट ट्रेन व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले असून या निर्णयाला या सरकारने पुढे नेण्याचे काम करावे असाही टोला त्यांनी लगावला आहे.
सत्तांतर होताच विकास कामांना ‘ब्रेक’
राजकीय नाट्यानंतर राज्यात सत्तांतर होताच प्रस्तावित कामांना ब्रेक देण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी नाशिकमध्ये असाच प्रकार घडला असताना आता नांदेडमध्येही बुधवारीच रस्त्याच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. रस्त्यांच्या कामांचे टेंडर राज्य सरकारने थांबवले आहे. एकीकडे विकासासाठी सर्वकाही असे भासवले जात असले तरी विकास कामातही राजकारण केले जात असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. मात्र, हे दुर्देवी आहे. विकास कामाबाबत अशी भूमिका घेतल्याने जनतेमध्ये रोष निर्माण होईल आणि आज ना उद्या यांना त्याला सामोरेही जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजप सरकार काळात मराठवाड्यावर अन्याय
मराठवाड्याकडे कायम भाजपाचे दुर्लक्ष राहिलेले आहे. विकासाच्या बाबतीत अन्याय किंवा भेदभाव केला जात नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मराठवाड्यावर अन्याय झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुन्हा कामे जोमात सुरु झाली होती. मात्र, आता झालेल्या सत्तांतरानंतर पुन्हा पहिले पाढे पच्चावंन्न अशी स्थिती झाली आहे. रस्ता कामाचे मंजूर झालेले टेंडर रद्द करणे म्हणजे हा दुर्देवी प्रकार आहे. राजकारणातील मतभेद खालच्या टोकाला गेल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.
कोर्टाच्या निकालावरच सर्वकाही अवलंबून
शिंदे गट आणि भाजपाच्या सरकारबद्दल आतापासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडीचे नेते हे मध्यावधी निवडणुका लागतील अशा शंका उपस्थित करीत आहे. मात्र, अशोक चव्हाण यांनी सावध भूमिका मांडली आहे. सरकार किती दिवस टिकेल हे आताच सांगता येणार नाहीतर 11 जुलै रोजीच्या कोर्टाच्यान निकालावरच सर्वकाही अवलंबून असल्याचे ते म्हणाले आहेत.