महाराष्ट्रासह 4 राज्यात विधानसभा निवडणुक कधी? आयोगाने दिल्या राज्यांना महत्वाचा सूचना

2024 मध्ये देशातील महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्य सरकारला काही महत्वाचा सूचना केल्या आहेत. ही कामे 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा असेही निवडणूक आयोगाने कळविले आहे.

महाराष्ट्रासह 4 राज्यात विधानसभा निवडणुक कधी? आयोगाने दिल्या राज्यांना महत्वाचा सूचना
MAHARASHTRA VIDHAN SABHAImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 10:01 PM

लोकसभा निवडणुकी पाठोपाठ आता देशातील चार महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला यावर्षी सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही तयारी निवडणूक आयोग करत आहे. निवडणूक आयोगाने राज्यांना 20 ऑगस्टपर्यंत मतदार यादी अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदार यादी अपडेट केल्यानंतर निवडणूक आयोग चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर कधीही जाहीर करण्याची शक्यता आहे.

सध्या काय आहे 4 राज्यांची राजकीय परिस्थिती?

जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपने युती तोडल्याने सरकार पडले

जम्मू आणि काश्मीरमध्ये सद्य परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू आहे. 2018 मध्ये येथील सरकारचा कार्यकाळ संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सप्टेंबर 2024 पर्यंत येथे निवडणुका अपेक्षित आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती. 2018 मध्ये भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी युतीचे सरकार भाजपने युती तोडल्याने पडले. डिसेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

हरियाणात पुन्हा भाजपच?

हरियाणा राज्यात सध्या भाजप सरकार आहे. 3 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत येथे निवडणुका अपेक्षित आहेत. हरियाणामध्ये भाजप आणि जेजेपी युतीचे सरकार होते. पण, त्यांची युती तुटली आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 41 तर जेजेपीला 10 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 6 अपक्ष आणि एक हलोपा यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. भाजपने मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्री केले. मात्र, त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

12 मार्चला जेजेपी आणि भाजपची युती तुटली. मनोहर लाल खट्टर यांच्या जागी भाजपने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सैनी यांची नेतेपदी निवड केली. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी आपल्याला 48 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. या बैठकीला भाजपचे 41 आणि 7 अपक्ष आमदार उपस्थित होते. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 46 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. त्यामुळे मुख्यमंत्री सैनी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करून सरकार वाचवले.

झारखंड पुन्हा हेमंत सोरेन यांच्या बाजूने उभे रहाणार का?

जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सध्या जेलमध्ये आहेत. त्यांच्या जागी चंपाई सोरेन यांची पक्षाने मुख्यमंत्री म्हणून निवड केली. झारखंडमध्ये प्राप्त परिस्थितीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस युतीचे सरकार आहे. 4 जानेवारी 2025 पर्यंत विधानसभेची मुदत आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2024 मध्ये येते निवडणुका अपेक्षित आहेत.

81 सदस्यांच्या राज्य विधानसभेसाठी 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. झारखंड मुक्ती मोर्चाने कॉंग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. जेएमएम 29, काँग्रेस 17, आरजेडी 1 आणि सीपीआय 1 असे आघाडीचे संख्याबळ आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 14 जागांपैकी 8 जागा जिंकून भाजपने आघाडी घेतली होती. तर, जेएमएमला 3, काँग्रेसला 2 जागा तर AJSU पक्षाला एक जागा जिंकता आली.

महाराष्ट्रात भाजप की महाविकास आघाडी

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर 2024 ला संपत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर 2024 मध्ये निवडणुका अपेक्षित आहेत. 2019 मध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुका झाल्या. 106 आमदारांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. पण, मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यामुळे 56 आमदारांच्या शिवसेनेने काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादीच्या 53 आमदारांसह महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

मे 2022 मध्ये नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंड केले. त्यांनी भाजपला सोबत घेऊन 30 जून 2022 रोजी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि उद्धव गट अशा दोन गटात विभागली गेली. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ एकनाथ शिंदे गटाकडेच राहिल असा आदेश दिला.

नुकत्याच झालेल्या 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात 48 पैकी 9 जागा जिंकल्या. मित्रपक्ष राष्ट्रवादीने 1 आणि शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या. तर इंडिया आघाडीमधील काँग्रेसने 13, शिवसेनेने (यूबीटी) 9 जागा आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाने 8 जागा जिंकल्या आहेत. तर, सांगलीत अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.