Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस नेमके कुठे आहेत? ‘भाजप’कडून सत्तेची रणनीती आखली जातेय? राज्यात चर्चेला उधाण

विरोधी पक्षनेते आणि राज्यातील भाजपचे वजनदार नेते देवेंद्र फडणवीस नेमके कुठे आहेत, हा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात चर्चेच्या मध्यस्थानी होता.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस नेमके कुठे आहेत? 'भाजप'कडून सत्तेची रणनीती आखली जातेय? राज्यात चर्चेला उधाण
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 8:48 AM

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा डाव रचल्याचं दिसंय. त्यामुळे शिवसेनेचे (Shivsena) एक-एक करुन जवळपास अर्धेअधिक आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहे. या फुटीमुळे अस्वथ झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे. पण माझीच लोकं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री नको, असं बोलताना उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडण्याचंही जाहीर केलं आणि त्यांनी त्यावर कालच अंमलबजावणी देखील केली. आता राज्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निवास सोडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्यातील भाजपचे वजनदार नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नेमके कुठे आहेत? महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची चिन्ह असताना फडणवीस माध्यमांसमोर दिसून न येणं, यामागं वेगवेगळं अर्थ काढले जातायत. तेच आपण जाणून घेणार आहोत.

सागर बंगल्यावर आमदारांची रिघ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या सागर बंगल्यावर काल भाजप आणि अपक्ष आमदारांची रिघ लागली होती. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सागर बंगल्यावर जाणून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, हे कळू शकलं नाही. तर त्यानंतर आपक्ष आमदार गीता जैन यांनी देखील सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी देखील माध्यमांच्या नजरा सागर बंगल्याकडे लागल्या होत्या. मात्र, याही वेळेस आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेसंदर्भात काहीही कळू शकलेलं नाही. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतील. या न त्या कारणावरुन ठाकरे आणि राणे यांच्यात वार पलटवार होतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार असल्यानं शांत बसणार ते नारायण राणे कसले. त्यामुळे राणे यांच्या सागर बंगल्यावरील हजेरीनं काल राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस नेमके कुठे आहेत?

विरोधी पक्षनेते आणि राज्यातील भाजपचे वजनदार नेते देवेंद्र फडणवीस नेमके कुठे आहेत, हा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात चर्चेच्या मध्यस्थानी होता. एकीकडे सागर बंगल्यावर आमदार येताना दिसत होते. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भाजपमधील केंद्र नेतृत्वासोबत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा करत असल्याचं बोललं जात होत. यामुळे देवेंद्र फडणवीस फक्त माध्यमांपासूनच दूर आहेत का, असंही यावेळी बोललं गेलं.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.