Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, 92 नगरपालिकांच्या निवडणुकांवर आज फैसला..!

Supreme court Hearing OBC Reservation Live : राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या 18 ऑगस्टला घेण्याचे निर्देश हे दिले होते. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका होऊ नयेत अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. असे असतानाही निवडणुकांचा घेण्याचा निर्णय दिल्याने याबद्दल पेच निर्माण झाला होता.

Supreme Court : ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, 92 नगरपालिकांच्या निवडणुकांवर आज फैसला..!
Supreme CourtImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 6:21 AM

मुंबई : राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका ह्या  (OBC Reservation) ओबीसी आरक्षणाशिवाय होणार की आरक्षणानुसार याचा फैसला आता आज होणार आहे. याप्रकरणी आता (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला हा निवडणुकांचा पेच उद्या मार्गी लागाणार का नाही हे पहावे लागणार आहे. सोमवारी शिवसेना कुणाची आणि आता (Municipal elections) नगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत मोठा निर्णय होणार आहे. इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्टला निवडणूक होणार होत्या. मात्र, याबाबत याचिका दाखल होताच स्थगिती देण्यात आली होती. पण आज यावर सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.

निवडणुक आयोगाने केली होती घोषणा

राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या 18 ऑगस्टला घेण्याचे निर्देश हे दिले होते. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका होऊ नयेत अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. असे असतानाही निवडणुकांचा घेण्याचा निर्णय दिल्याने याबद्दल पेच निर्माण झाला होता. मात्र, याबाबत सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत असलेल्या उमेदवारांचे काय होणार हे आज स्पष्ट होणार आहे.

निवडणुक कार्यक्रम आगोदर जाहीर झाला असेल तर

आरक्षणाशिवाय निवडणुका हा निर्णय निवडणुक आयोगाने घेतल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यामध्ये काय हस्तक्षेप करणार हे पहावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. अन्यथा 18 ऑगस्ट रोजीच या 92 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असत्या, पण आता निर्णय काय होणार हे पहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

या जिल्ह्यांमध्ये होणार निवडणुका

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा. बारामती, भुसावळ, बार्शी, जालना, बीड, उस्मानाबाद या अ वर्ग नगरपालिकांचा समावेश आहे.

‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान.
पुण्यात घडलं तेच कल्याणमध्ये? महापालिका रूग्णालयात गर्भवतीचा मृत्यू अन
पुण्यात घडलं तेच कल्याणमध्ये? महापालिका रूग्णालयात गर्भवतीचा मृत्यू अन.
.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले
.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले.
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा.
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात.
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी.
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद.
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.