मुंबई : राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका ह्या (OBC Reservation) ओबीसी आरक्षणाशिवाय होणार की आरक्षणानुसार याचा फैसला आता आज होणार आहे. याप्रकरणी आता (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला हा निवडणुकांचा पेच उद्या मार्गी लागाणार का नाही हे पहावे लागणार आहे. सोमवारी शिवसेना कुणाची आणि आता (Municipal elections) नगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत मोठा निर्णय होणार आहे. इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्टला निवडणूक होणार होत्या. मात्र, याबाबत याचिका दाखल होताच स्थगिती देण्यात आली होती. पण आज यावर सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या 18 ऑगस्टला घेण्याचे निर्देश हे दिले होते. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका होऊ नयेत अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. असे असतानाही निवडणुकांचा घेण्याचा निर्णय दिल्याने याबद्दल पेच निर्माण झाला होता. मात्र, याबाबत सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत असलेल्या उमेदवारांचे काय होणार हे आज स्पष्ट होणार आहे.
आरक्षणाशिवाय निवडणुका हा निर्णय निवडणुक आयोगाने घेतल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यामध्ये काय हस्तक्षेप करणार हे पहावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. अन्यथा 18 ऑगस्ट रोजीच या 92 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असत्या, पण आता निर्णय काय होणार हे पहावे लागणार आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा. बारामती, भुसावळ, बार्शी, जालना, बीड, उस्मानाबाद या अ वर्ग नगरपालिकांचा समावेश आहे.