अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर कारवाई का नाही? : राज ठाकरे
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर हल्लाबोल सुरुच आहे. या लोकसभा निवडणुकीतली त्यांची शेवटची सभा नाशिकमध्ये झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेतला. शिवाय विरोधी पक्षात असताना सिंचन घोटाळ्याप्रकरणी घसा फोडून ओरडणारं भाजप आता गप्प का आहे, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई […]
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर हल्लाबोल सुरुच आहे. या लोकसभा निवडणुकीतली त्यांची शेवटची सभा नाशिकमध्ये झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेतला. शिवाय विरोधी पक्षात असताना सिंचन घोटाळ्याप्रकरणी घसा फोडून ओरडणारं भाजप आता गप्प का आहे, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई का नाही? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला.
नाशिकमध्ये नरेंद्र मोदींनी येऊन कांदा उत्पादकांना भाव देऊ असं सांगितलं, देवेंद्र फडणवीस दोन वर्षांपूर्वी म्हणाले आम्ही 12 हजार विहिरी बांधल्या. तरीही 28 हजार गावं आज दुष्काळग्रस्त आहेत. नाशिकच्या जवळच्या तालुक्यातील गावात जीवावर बेतून पाणी भरत आहेत. काय झालं त्या विहिरींचं? आधीच्या सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत होते. त्यावेळी सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचारावर भाजपचे नेते घसा फोडून ओरडत होते. पण सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप केले होते ते सुनील तटकरे आणि अजित पवारांवर का नाही कारवाई झाली? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
भाजप-शिवसेनेच्या काळात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं भांडवल करून हे सत्तेत आले आणि याच शेतकऱ्यांविषयी भाजपचे नेते वाट्टेल ती विधानं करतात. यात केंद्रीय कृषीमंत्र्यांपासून ते राज्यातील नेत्यांपर्यंत सगळे आहेत. हा सत्तेचा माज आहे. आज शेती तोट्यात आहे म्हणून शेतकरी कुटुंबातील मुलं, मुली शेती सोडून नोकरीच्या शोधात फिरत आहेत. याच तरुण-तरुणींना मोदींनी 2014 ला सांगितलं की आम्ही दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ. पण पुढे झालं काय? किती नोकऱ्या दिल्या गेल्या?, असं सवाल विचारत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.
VIDEO : राज ठाकरेंचं नाशिकमधील संपूर्ण भाषण