मुंबई : मविआचे मतदार वैतागलेले आहेत. आमदार विटलेत. एक संजय जाणार हे वक्तव्य खरं ठरलं. मविआचे आमदार विटलेत. अपक्ष आमदार किती दिवस अपमान सहन करणार. मंत्री आमच्याकडे कमिशन (Commission) मागतात. असं जर आमदारच सांगत असतील, तर काय बोलणार. मुख्यमंत्र्यांशी कोणता आमदार भेटू शकतो का. मंत्रीतरी भेटू शकतो का.. म्हणू ते विटलेत, अशी खरबरीत टीका नवनियुक्त राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली. संजय राऊत आणि शिवसेना (Shiv Sena) जी मागच्या निवडणुकीत जिंकली ती मोदींचे फोटो लावून. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, असं सांगून शिवेसेनेनं आपले आमदार निवडून आणले, असंही ते म्हणाले.
अनिल बोंडे म्हणाले, हा जोर का धक्का धिरे से लगा, असं आहे. पण, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणतील, काही लागलं नाही. धक्का लागला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी नेता असेल तर तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. माणसं जवळ करणारा, विश्वास ठेवणारा असा नेता राज्यात फक्त देवेंद्र फडणवीस आहे. म्हणूनच शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांचा विरोध करतात. महाविकास आघाडीचे सरकार केव्हा पडेल, याचा कुणी मुहूर्त सांगू नये. आपआपसातल्या कहलानं हे सरकार पडेल.
अनिल बोंडे म्हणाले, मी आमदार असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तेव्हा दुपारी एक वाजतापासून देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी लाईन लागायची. फडणवीस आमदारांचे प्रश्न सोडवायचे. पण, आता मुख्यमंत्री सहसा कुणाला भेटत नाहीत. आमदारांना तर सोडा मंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांशी भेटता येत नाही. अपक्ष आमदार म्हणतात, मंत्री कमिशन मागतात. मुख्यमंत्र्यांशी कोणता आमदार भेटू शकतो, असा सवालही अनिल बोंडे यांनी केला. मागच्या वेळी पीएम नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून शिवसेनेनं आपले आमदार निवडून आणले. फसवेगिरीनं मागच्या वेळी विजय मिळवला. यावेळी मात्र, तिन्ही पक्ष एकत्र येऊनही ते राज्यसभेसाठी आपला एक उमेदवार निवडून आणू शकले नाही. विशेष म्हणजे संजय राऊतांचा मतं मिळविण्यात शेवटचा नंबर आहे. खूप कमी मतांनी त्यांना विजय मिळाला, हे विसरू नये.