पुणे : महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीसाठी भाजप नगसेवकांना व्हिप जारी करण्यात आला आहे. सांगली महापालिकेत बसलेल्या झटक्यानंतर भाजपने हा निर्णय घेतलाय. भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांवरुन भाजपने स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीपूर्वी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.(Whip issued to BJP corporators for election of PMC Standing and Education Committee)
पुणे महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीची निवडणूक शुक्रवारी पार पडणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून हेमंत रासने यांनी, तर शिक्षण समिती अध्यक्षपतासाठी भाजपकडून मंजुश्री खर्डेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्षपदासाठी कालिंदा पुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बंडू गायकवाड आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी सुमन पठारे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला आहे.
भाजप – १०
राष्ट्रवादी – ४
काँग्रेस – १
सेना – १
भाजप – ९९
राष्ट्रवादी – ४२
काँग्रेस – १०
सेना – १०
एमआयएम – १
मनसे – २
सांगली महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रमक केलाय. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.
चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली.
भाजप – 41
अपक्ष – 2
काँग्रेस – 20
राष्ट्रवादी – 15
संबंधित बातम्या :
Whip issued to BJP corporators for election of PMC Standing and Education Committee