नरेंद्र मोदी यांच्या बलाढ्य साम्राज्यात, गुजरातेत तळ ठोकला, कोण आहेत AAP चे ते 5 शिलेदार?

आपला गुजरातेत 35 लाख मतं मिळाली. भाजपच्या बालेकिल्ल्यात हा आकडा जास्त महत्त्वाचा आहे. आपने या निवडणुकीत 12.92 टक्के मतांचा टक्का संपादन केला.

नरेंद्र मोदी यांच्या बलाढ्य साम्राज्यात, गुजरातेत तळ ठोकला, कोण आहेत AAP चे ते 5 शिलेदार?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 11:07 AM

अहमदाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या होमग्राऊंड गुजरातमध्ये (Gujrat) भाजपने अभूतपूर्व यश मिळवले. पारंपरिक शत्रू काँग्रेसा धूळ चारली. तर नव्याने गुजरातेत नशीब आजमावणाऱ्या आम आदमी पार्टीने (Aam Admi Party) इथे खातं उघडलं. भाजपने विक्रमी विजय संपादन केला असला तरीही सध्या चर्चा आहे ती आम आदमी पार्टीची. विशेषतः त्या पाच आमदारांची, ज्यांनी भाजपच्या बलाढ्य साम्राज्यात, मोदींच्या राज्यात आपलं भक्कम स्थान निर्माण केलं.

भाजप लाटेत टिकाणारे, भगव्याला कडवी झुंज देणारे आम आदमी पार्टीचे पाच आमदार कोण आहेत ते पाहुयात-

 चैतरभाई दामाजीभाई वसावा

गुजरातमधील डेडियापाडा विधानसभा मतदार संघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार चैतरभाई दामाजी भाई वासावा हे जिंकले. त्यांनी काँग्रेसच्या जर्माबेन शुक्लाल वसावा यांचा पराभव केला. चैतरभाई यांना 1 लाख 3 हजार 433 मतं मिळाली. तर जर्माबेन शुक्लाल यांना 12 हजार 757 मतं मिळाली. तर भाजपच्या हितेशकुमार देवजीभाई वसावा यांना 63,151 मतं मिळाली.

मकवाना उमेशभाई नारनभाई

बोटाद मतदारसंघातून आपचे उमेदवार मकवाना उमेशभाई नारनभाई यांनी भाजपच्या घनश्यामभाई प्रागजीभाई विरानी यांच्यावर मात केली. मकवाना यांना80,581 मतं मिळाली. तर भाजपच्या प्रागजीभाई विरानी यांना 77,802 मतं मिळाली.

सुधीरभाई वाघाणी

गुजरातमधील गरियाधर विधानसभा मतदारसंघातून आपचे सुधीरभाई वाघाणी विजयी झाले. भाजपच्या नाकराणी केशुभाई हीरजीभाई यांचा इथे पराभव झाला. सुधीर वाघाणी यांना 60,944 मतं मिळाली तर केशुभाई यांना 56,125 मतं मिळाली.

भूपेंद्रभाई भायाणी

विसावदर मतदारसंघातून भूपेंद्रभाई भायाणी विजयी झाले. त्यांनी भाजपच्या हर्षदकुमार माधवजीभाई रिबडिया यांचा पराभव केला. भायाणी यांना 66,210 मतं मिळाली. हर्षदकुमार यांचा थोडक्याने पराभव झाला.

आहीर हेमंतभाई हरदासभाई

जमोधपूर मतदारसंघातून आहीर हेमंतभाई हरदासभाई यांनी भाजपच्या चीमनभाई सापरिया यांचा पराभव केला. आहीर हेमंतभाई हरदासभाई यांना 71,397 मतं मिळाली. तर चीमनभाई सापरिया यांना 60,994 मतांवर समाधान मानावं लागलं.

गुजरातमध्ये आम आदमी पार्टीची चर्चा आहे, कारण याच निकालांनंतर आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. आपला गुजरातेत 35 लाख मतं मिळाली. भाजपच्या बालेकिल्ल्यात हा आकडा जास्त महत्त्वाचा आहे. आपने या निवडणुकीत 12.92 टक्के मतांचा टक्का संपादन केला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.