गडकरी की फडणवीसांच्या निकटवर्तीयांना, सोलापुरात कुणाला मंत्रिपद?
निवडणुकांच्या या निकालानंतर आता सर्वांच्या नजरा या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलेल्या आहेत. आमदार म्हणून निवडून आले (Maharashtra Cabinet), मात्र मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार, या संभ्रमात सध्या सर्वच राजकीय पक्ष आहेत.
सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यंदाच्या निवडणुकांमध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल समोर आले (Maharashtra Vidhansabha Results). जिथे सर्व एक्झिट पोल महायुतीला 210 च्या वर जागा मिळतील असा दावा करत होते, ते सर्व एक्झिट पोल फेल ठरले. महायुतीला केवळ 162 जागा जिंकता आल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत मोठी मुसंडी मारणार 54 जागांवर विजय मिळवला. निवडणुकांच्या या निकालानंतर आता सर्वांच्या नजरा या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलेल्या आहेत. आमदार म्हणून निवडून आले (Maharashtra Cabinet), मात्र मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार, या संभ्रमात सध्या सर्वच आमदार आहेत.
मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळू शकतं याचे अंदाज लावण्यास आता सुरुवात झाली आहे (Maharashtra Cabinet Minister). सोलापुरातही काही अशीच स्थिती आहे. सोलापुरात मंत्रिमंडळासाठी दोन मंत्र्यांची नावं आघाडीवर आहेत. यापैकी एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर दुसरे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे मानले जातात.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख
सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांचा पराभव करत आपला विजय संपादन केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात परिवहन कामगार राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले विजयकुमार देशमुख हे सोलापूरचे पालकमंत्री देखील आहेत. स्वच्छ कारभार आणि कोणत्याही प्रकारचा यांच्यावरती आत्तापर्यंत आरोप झालेला नाही, ही विजयकुमार देशमुख यांच्या जमेची बाजू आहे. विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपरिषद या भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत.
विजयकुमार देशमुख हे मुख्यमंत्र्यांचे अतिशय विश्वासू मानले जातात. विवेक कुमार देशमुख हे लिंगायत समाजाचे असल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे म्हणजे लिंगायत समाजाला स्थान दिल्याचा संदेश राज्यभर जाणार. त्यामुळे यंदा राज्यमंत्री ऐवजी त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख
राज्याचे सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख हे सोलापूर दक्षिण मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या मौलाली सय्यद पराभव केला. दक्षिण सोलापूर हा काँग्रेसचा गड मानला जायचा, मात्र गत विधानसभा निवडणुकीपासून इथे सुभाष देशमुखांनी भाजपचा कमळ फुलविला आहे. याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा प्रतिनिधित्व केले होते. मतदारसंघात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून दुसऱ्यांदा मतदारसंघातील जनतेने आपल्या गळ्यात विजयाची माळ घातल्याच सुभाष देशमुख यांनी ‘टीव्ही-9’ ला सांगितलं.
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. सुभाष देशमुख हे शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. शेतकरी कर्जमाफी अंमलबजावणीप्रक्रियेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी गठित केलेल्या कमिटीमध्ये सुभाष देशमुख यांनी मोलाचे काम केले. सुभाष देशमुख हे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू मानले जातात