कोण आहेत अद्वय हिरे ज्यांनी भाजप सोडून ठाकरे यांच्या शिवसेनेचं शिवबंधन बांधलं?

अपूर्व आणि अद्वय हिरे यांचे मालेगावात मोठं काम आहे. ते भारतीय जनता पक्षात होते. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रातलं हिरे कुटुंब राजकारणातं मोठं कुटुंब आहे.

कोण आहेत अद्वय हिरे ज्यांनी भाजप सोडून ठाकरे यांच्या शिवसेनेचं शिवबंधन बांधलं?
अद्वय हिरे
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 6:08 PM

मुंबई : अद्वय हिरे हे सत्ताधारी पक्षातून म्हणजे भाजपमधून ठाकरे यांच्या शिवसेनेत आले आहेत. आज त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल बोलताना अद्वय हिरे म्हणाले, जेव्हापासून शिंदे गट भाजपमध्ये आला तेव्हापासून भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपत स्थान उरले नाही. सन्मानाची वागणूक दिली जात नाही. मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहील. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्तेचा प्रयत्न केला. तरीही भाजपनं आंदोलनाची भूमिका समजून घेतली नाही, अशी खंत अद्वय हिरे यांनी व्यक्त केली.

मालेगावात होणाऱ्या प्रकल्पामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. पण, भाजप त्यांची बाजू समजून घेत नाही. उद्धव ठाकरे यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी माझ्यासह घेतली असल्याचं अद्वय हिरे यांनी टीव्ही ९ मराठीच्या स्टुडियोत मुलाखत देताना सांगितलं.

तशी गद्दारी मी करणार नाही

शेतकऱ्यांची भूमिका मांडत होतो तेव्हा मला समजून घेण्यासाठी वेळ नव्हता. आता माझी भूमिका समजून घ्यावीसी का वाटते, असा सवाल अद्वय हिरे यांनी भाजपला विचारला. ५० गद्दार ज्या पद्धतीनं भाजपच्या हाती लागले तशी गद्दारी मी करणार नसल्याचं हिरे म्हणाले.

कितीही आमिष भाजपनं दिलं तरी मी भाजपमध्ये परत जाणार नाही. सत्तेसाठी, पैशासाठी बाप बदलणारी माझी औलाद नाही, असंही हिरे यांनी ठणकावून सांगितलं.

हिरे म्हणाले, दादा भुसे यांच्या विरोधात शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढणार आहे. उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग मालेगाव तालुक्यात आहे. त्यांच्याच बळावर गद्दार आमदार झाले होते, असा घणाघातही हिरे यांनी केला.

कोण आहेत अद्वय हिरे?

अपूर्व आणि अद्वय हिरे यांचे मालेगावात मोठं काम आहे. ते भारतीय जनता पक्षात होते. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रातलं हिरे कुटुंब राजकारणातं मोठं कुटुंब आहे. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे हे फार मोठी परंपरा राजकारणात आहे. अद्वय हिरे हे तरुण पिढीचे नेते राजकारणात आहेत. ते भाजपतून शिवसेनेत आले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.