उद्धव ठाकरेंशी इमान, शिंदे गटावर शरसंधान, संतोष बांगर यांना भिडणाऱ्या अयोध्या पौळ आहेत तरी कोण?

अयोध्या सोशल मीडियावर चांगल्याच एक्टीव्ह आहेत. त्या शिवसेनाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आहेत. एक विशेष गोष्ट म्हणजे त्या LGBT म्हणजेच समलिंगी समाजाच्या हक्काला समर्थन देतात.

उद्धव ठाकरेंशी इमान, शिंदे गटावर शरसंधान, संतोष बांगर यांना भिडणाऱ्या अयोध्या पौळ आहेत तरी कोण?
संजय बांगर यांच्यावर टीका केल्यापासून अयोध्या पौळ चर्चेत आहेत
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 7:09 PM

नाजीर खान, परभणी: संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्याशी थेट पंगा घेणाऱ्या, मातोश्री हाच माझा बाप आणि आई म्हणणाऱ्या आणि ज्यांना शिवसेना पक्षप्रमुख थेट उद्धव ठाकरेंनी फोन केला, त्या अयोध्या पोळ (Ayodhya Poul) पाटील. अयोध्या यांचं नाव अचानक चर्चेत आलं आहे, आणि याला कारण आहे, संतोष बांगर यांना दिलेलं आव्हान, त्यांच्या समर्थकांना दिलेलं प्रत्युत्तर आणि सोशल मीडियातून शिवसेनेच्या ठाकरे गटाची (Uddhav Thackeray Group) मांडणारी रोखठोक भूमिका. मात्र, या दोन दिवसांच्या आधी कदाचित अयोध्या पोळ पाटील कोण? असं जर विचारलं असतं, तर कदाचित कुणाला सांगताही आलं नसतं. मात्र, जसा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्ला झाला, तसं अयोध्या पोळ पाटील हे नाव चर्चेत आलं.

अयोध्या पोळ पाटील या मूळच्या परभणी जिल्ह्यातल्या. पालम तालुक्यातलं फळा हे त्यांचं मूळ गाव. वडीलांचं नाव गुणाजीराव तर आईचं नाव गंगाबाई. अयोध्या यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. गेली 12 वर्षांपासून त्या मुंबईतच राहतात. त्यामुळे परभणीत त्या सक्रीय नाहीत. अयोध्या यांच्या आजी मुंबईत राहतात,त्यांच्याकडेच त्या वास्तव्यास आहेत. उद्धव ठाकरेंनी जेव्हा अयोध्या यांना फोन केला, तेव्हाही त्यांनी ही माहिती सांगितली होती.

अयोध्या पौळ यांचे आई आणि वडील:

हे सुद्धा वाचा

आता प्रश्न पडतो, अयोध्या शिवसेनेत कधी आल्या आणि त्यांना काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? तर लहानपणापासून त्यांना शिवसेनेचं बाळकडू मिळालं. त्यांच्या आई म्हणजेच गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या. म्हणजेच घरातूनच त्यांना शिवसेनेचं बाळकडू मिळालं.बाल शिवसैनिक ते युवा सेना असा त्यांचा प्रवास झाला. मुंबईतील धारावी युवती विधानसभा समन्वय म्हणूनही त्या काम पाहतात.

अयोध्या सोशल मीडियावर चांगल्याच एक्टीव्ह आहेत. त्या शिवसेनाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आहेत. त्यांच्या फेसबूकवरही याचा उल्लेख आहे. जन्मभूमी परभणी, कर्मभूमी मुंबई असा त्यांनी उल्लेख केलेला आहे.

हेच नाही, एक विशेष गोष्ट म्हणजे त्या LGBT म्हणजेच समलिंगी समाजाच्या हक्काला समर्थन देतात. याशिवाय, अयोध्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या कामही करतात.

अयोध्या पौळ यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप:

अयोध्या पौळ या सोशल मीडियावर चांगल्याच एक्टीव्ह आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्या शिंदे गट, भाजपवर नेहमी निशाणा साधतात. त्यातच संतोष बांगर यांच्या गाडीवर जेव्हा हल्ला झाला, त्याहीवेळी त्यांनी थेट शिंदे गटाला निशाण्यावर घेतलं, आणि यामुळे राग अनावर झाल्याने एका बांगर समर्थकाने पौळ यांना अर्वाच्च भाषेत फोन कॉल केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.