आव्हाड म्हणाले मुजोर अधिकारी, शिवाजी आढळरावांकडून बदलीला विरोध, कोण आहेत अभिमन्यू काळे?

| Updated on: Apr 23, 2021 | 1:30 PM

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची मंगळवार 20 एप्रिलला तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ( IAS Officer Abhimanyu Kale transferred)

आव्हाड म्हणाले मुजोर अधिकारी, शिवाजी आढळरावांकडून बदलीला विरोध, कोण आहेत अभिमन्यू काळे?
जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू काळे, शिवाजीराव आढळराव पाटील
Follow us on

मुंबई : रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरणात (Remdesivir Injection) राज्य सरकारने अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे (Abhimanyu Kale) यांची बदली केली होती. मुजोर अधिकाऱ्यांना बाजूला करणं योग्यच असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. मात्र शिवसेनेचे उपनेते आणि माजी खाजदार शिवाजी आढळराव पाटील (Shiv Sena leader Shivajirao Adhalarao Patil) यांनी विरोध दर्शवत थेट ठाकरे सरकारला (Thackeray Sarkar) घरचा आहेर दिला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोघा नेत्यांना समोरासमोर आणणारे अभिमन्यू काळे कोण आहेत, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. (Who is IAS Officer Abhimanyu Kale transferred by Thackeray Govt in Remdesivir Injection case)

अभिमन्यू काळे यांची बदली

रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची मंगळवार 20 एप्रिलला तडकाफडकी बदली करण्यात आली होती. उत्पादक कंपन्यांकडून रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन घेण्यात अपयश आल्याच्या कारणावरुन ही बदली करण्यात आल्याचे बोलले जाते.

याआधी, 2018 मधील गोंदिया भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशी अनेक ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तेव्हा गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी अभिमन्यू काळे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात होते.

कोण आहेत अभिमन्यू काळे?

महसूल विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले अभिमन्यू काळे हे स्टेट केडर सर्विसमधून IAS झालेले आहेत. ते 2005 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सहा महिन्यापासून ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त होते. या अगोदर दोन वर्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे एमडी म्हणून त्यांनी काम केलेले आहे .

ते भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी असताना लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळेस त्यांनी आचारसंहिता असतानाही लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ दिल्याचा ठपका ठेवल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली होती. त्यानंतर निवडणूक संबंधित कुठलेही काम त्यांना आजपर्यंत दिलेले नाही

जॉईंट सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी

अभिमन्यू काळे हे जॉईंट सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांचं एमएससी अॅग्रीकल्चर शिक्षण झालेलं आहे. नांदेड जिल्हा परिषद मुख्याधिकारी, नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा कलेक्टर, त्यानंतर पर्यटन विभागाचे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे एमडी आणि त्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून काम केलेले आहे. ( IAS Officer Abhimanyu Kale transferred)

सहा महिन्यात कुठलंही प्रभावी काम नाही

अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून गेल्या सहा महिन्यांमध्ये कुठलंही प्रभावी काम त्यांनी केलेलं नाही. कोरोनाची दुसरी लाट येणार आहे अशी सर्वत्र चर्चा असतानाही, कोरोनाच्या लाटेमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने चुका केल्या. या चक्रातून दुरुस्ती करून नव्याने एक यंत्रणा उभी करण्यासाठी ते अपयशी ठरले. ऑक्सिजन प्लांट किंवा रेमडेसिविर संबंधित इंजेक्शन म्हणा किंवा औषधी म्हणून हे सर्व पुरवठा करून येथे मुबलक प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करण्याची व्यवस्था होणार आहे, किती सक्षम करणार याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. राज्यातील मेडिकल म्हणा किंवा औषध पुरवठा कंपनी आहे त्यांच्याशी व्यवस्थित यांनी कॉर्डीनेट केलेले नाही.

संबंधित बातम्या :

शिवाजी आढळरावांनी शड्डू ठोकला, अभिमन्यू काळेंच्या बदलीला थेट विरोध, ठाकरे सरकारला चॅलेंज

रेमडिसिव्हरसाठी भाजपला पत्र देणारे FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली, आव्हाड म्हणतात, मुजोर अधिकारी

(Who is IAS Officer Abhimanyu Kale transferred by Thackeray Govt in Remdesivir Injection case)