छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करणारे ललित टेकचंदाणी कोण आहेत?
ललित टेकचंदाणी हे व्यापार आणि बांधकाम क्षेत्रातील एक मोठे नाव असून त्यांच्यावर याच क्षेत्रसंबंधी गुन्हे देखील दाखल आहे.
नाशिक : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह त्यांच्या दोन कार्यकर्त्यांवर चेंबुर पोलीस ठाण्यात धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापार व्यावसायिक असलेले ललितकुमार शाम टेकचंदाणी (lalitkumar Tekchandani) यांच्या तक्रारीवरुन चेंबुर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भुजबळ यांनी ललित टेकचंदाणी यांना धमकी दिली का ? छगन भुजबळ आणि ललित टेकचंदाणी यांची नेमकी ओळख काय ? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच स्वतः छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत ललित टेकचंदाणी हेच मला निगेटिव्ह मेसेज करत असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच छगनलाल… चिक्की खाय… बिक्की खाय असे ललित टेकचंदाणी निगेटिव्ह मेसेज करत असल्याचे भुजबळ यांनी म्हंटल्याने ललित टेकचंदाणी ही व्यक्ती आहे तरी कोण ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
छगन भुजबळ यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करणारे टेकचंदाणी यांचे संपूर्ण नाव ललितकुमार श्याम टेकचंदाणी असे आहेत.
चेंबुर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत त्यांनी सामाजिक कार्यकर्ता असल्याचे म्हंटले असले तरी ते एक मोठे व्यावसायिक आहे.
ललित टेकचंदाणी हे व्यापार आणि बांधकाम क्षेत्रातील एक मोठे नाव असून त्यांच्यावर याच क्षेत्रसंबंधी गुन्हे देखील दाखल आहे.
ललित टेकचंदाणी हे कधीकाळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते.
छगन भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना ललित टेकचंदाणी यांच्यासंपत्ती शिवाय भुजबळ निर्णय घेत नसल्याचं बोललं जायचे.
भुजबळ 2014 च्या आधी मंत्री असतांना ललित टेकचंदाणी यांच्याशिवाय बांधकाम विभागात एकही पान हलायचे नाही अशी तेव्हा चर्चा असायची.
जवळपास दहा वर्षे छगन भुजबळ आणि ललित टेकचंदाणी यांच्यात अत्यंत चांगला संपर्क होता. 2014 नंतर सत्तांतर होताच टेकचंदाणी आणि भुजबळ यांच्यात खटके उडाले होते.
त्याआधी ललित टेकचंदाणी हे गोपीनाथ मुंडे यांच्याशी संबंधित काम करत असल्याचे भुजबळ यांनीच पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
सार्वजनिक खात्याचे भुजबळ मंत्री असतांना ललित टेकचंदाणी यांच्यासह पाच जणांवर दिल्ली येथील अभिषेक मांगलिक यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
ललित टेकचंदाणी यांची चेंबुर परिसरात हेक्स कॉर्पोरेशन या नावाने 15 मजली इमारत असून टेकचंदाणी हे मुंबईतील मोठे नाव आहे.
ललित टेकचंदाणी यांनी भुजबळ यांच्या विरोधात देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना गैरकारभार केल्याच्या संदर्भात तक्रारी पोलिसांत केल्या होत्या. त्यावरून गुन्हे देखील दाखल झाले होते.