Sachin Pilot | 26 व्या वर्षी खासदार ते केंद्रीय मंत्री, गहलोत सरकारला हादरे देणारे सचिन पायलट कोण आहेत?
2004 मधील लोकसभा निवडणुकीत सचिन पायलट राजस्थानमधील दौसा मतदारसंघातून विजयी झाले होते. वयाच्या 26 व्या वर्षी सर्वात तरुण खासदार ठरण्याचा मान मिळवला होता
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. दिल्लीवारीवर असलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्याने संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पायलट यांच्या पक्षप्रवेशाची चिन्हं आहेत. (Who is Rajasthan Deputy CM Congress Leader Sachin Pilot)
राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या काँग्रेस नेते सचिन पायलट यांची नाराजी सत्तास्थापनेपासून पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असताना उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाल्याने पायलट काहीसे खट्टू होते.
सचिन पायलट कोण आहेत?
- 42 वर्षीय सचिन पायलट हे काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट आणि रमा पायलट यांचे पुत्र. वडील राजेश पायलट हे केंद्रीय मंत्री होते.
- नवी दिल्लीत एअरफोर्स बाल भारती स्कूल येथे सचिन पायलट यांचे शालेय शिक्षण, दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बीए, आयएमटी गाझियाबादमधून मार्केटिंगचा डिप्लोमा आणि अमेरिकेच्या फिलाडेल्फियातील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए
- 2004 मधील लोकसभा निवडणुकीत सचिन पायलट राजस्थानमधील दौसा मतदारसंघातून विजयी. वयाच्या 26 व्या वर्षी सर्वात तरुण खासदार ठरण्याचा मान
- 2009 मधील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या किरण माहेश्वरी यांचा 76 हजार मतांच्या फरकाने पराभव करत सचिन पायलट यांनी अजमेरची जागा जिंकली.
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारमध्ये (यूपीए 2) 2012 मध्ये सचिन पायलट केंद्रात कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा अजमेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली, मात्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सांवरलाल जाट यांच्याकडून 1 लाख 71 हजार 983 च्या मताधिक्क्याने पराभव.
- 2014 मध्ये राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
- 2018 च्या विधानसभा निवडणुकीत युनूस खान यांचा 54 हजार 179 मतांनी पराभव करुन पायलट टोंक मतदारसंघातून विजयी
- 17 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ
- सचिन पायलट 2004 मध्ये सारा अब्दुल्ला यांच्याशी विवाहबद्ध. सारा अब्दुल्ला या जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची कन्या
Sachin Pilot | काँग्रेसचा ‘पायलट’ भाजप एअरलाईन्सच्या वाटेवर, नड्डांच्या उपस्थितीत सचिन पायलट यांच्या पक्षप्रवेशाची चिन्हं https://t.co/H2crDk3e1R #Sachinpilot #Sachin_pilot #AshokGehlot #RajasthanPolitics
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 13, 2020
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
सचिन पायलट यांनी काल काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. पायलट आणि शिंदे हे जवळचे मित्र आहेत. दोघांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून राजस्थान सरकार अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या :
राजस्थानमध्ये राजकारण तापले, गेहलोत यांचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप, पायलट दिल्लीत
सचिन पायलट-ज्योतिरादित्य शिंदेंच्या भेटीला, राजस्थानमध्ये राजकीय भूंकपाची चिन्हे
(Who is Rajasthan Deputy CM Congress Leader Sachin Pilot)