Ratnakar Gutte : कोठडीत राहून निवडणूक जिंकण्याची ताकद, डोळे फिरवणारी संपत्ती, कोण आहेत रत्नाकर गुट्टे?

रत्नाकर गुट्टेंवर ईडीची कारवाई आता नेमकी कशासाठी? गुट्टेंचं अख्खं कुटुंबच कसं घोटाळ्यात अडकलंय, यावर स्पेशल रिपोर्ट

Ratnakar Gutte : कोठडीत राहून निवडणूक जिंकण्याची ताकद, डोळे फिरवणारी संपत्ती, कोण आहेत रत्नाकर गुट्टे?
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 4:06 PM

मुंबई :  तुरुंगात राहूनही आमदारकीची निवडणूक जिंकणारे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) रत्नाकर गुट्टेंच्या साम्राज्याला आता सुरुंग लागलाय, अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं रत्नाकर गुट्टेंच्या संपत्ती ताब्यात घेण्यास सुरुवात केली. बुधवारी (23 डिसेंबर) ईडीनं गुट्टेंच्या गंगाखेड शुगर्सची तब्बल 225 कोटींची मालमत्ता जप्त केली. अंबाजोगाई रोडवरच्या योगेश्वरी हॅचरीज ही मालमत्ता ईडीकडून सील करण्यात आलीय. पण, हे रत्नाकर गुट्टे कोण? आणि गुट्टेंवरची ही कारवाई आता नेमकी कशासाठी? यावर स्पेशल रिपोर्ट (Who is Ratnakar Gutte Special Report on property and scams)

मजूर ते कंत्राटदार बनण्यापर्यंतचा प्रवास

परळीच्या थर्मल प्लांटवर काम करणारा आठवी शिकलेला एक मजूर… नाव रत्नाकर गुट्टे… काम करण्यासोबतच त्यांची आजूबाजूलाही नजर असायची, कोण काय करतंय, कशाप्रकारे व्यवहार चालतात,  हे सगळं ते हळूहळू समजून घेत होते. अनेकांशी गोड बोलून त्यानं सगळं शिकून घेतलं, आणि ते थेट कंत्राटं घेऊ लागले. अधिकारी आणि राजकारण्यांशी जवळीक वाढवत त्यांनी कंत्राटं वाढवली आणि जिल्ह्यातले बडे कंत्राटदार बनले असा आरोप विरोधक कायम करतात.  पैसापाणी भरपूर होता, पण त्यांना इथंच थांबायचं नव्हतं. सुनील हायटेक प्रा. लिमिटेड नावाची त्यांनी कंपनी बनवली, आणि देशभरातील वीज प्रकल्पांची कंत्राटं ते घेऊ लागले.

कंत्राटदार ते साखर सम्राट

बीड… ऊसतोड मजुरांचा जिल्हा… याच जिल्ह्यातील ऊसाचं महत्त्व गुट्टेंनी ओळखलं, आणि साखरेतून पैसा कमावण्याची शक्कल त्यांना सुचली. गंगाखेडमध्ये त्यांनी साखर कारखाना सुरु केला. ज्याचं उद्घाटन खुद्द शरद पवार यांनी केलं. त्यातच महादेव जानकरांशी जवळीक वाढली, आणि गुट्टे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये दाखल झाले, जो सध्या भाजपचा मित्रपक्ष आहे. मात्र, असं असलं तरी गुट्टेंनी सगळ्याच पक्षांसोबत आपले संबंध जपले. 2014 ला रासपच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली, मात्र, काँग्रेसच्या मधूसुदन केंद्रेंकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

कोठडीत राहून निवडणूक जिंकणारे गुट्टे

शेतकऱ्यांच्या नावे हजारो कोटींची कर्ज उचलल्या प्रकरणी जून 2019 मध्ये गुट्टेंना अटक करण्यात आली. परभणीच्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं, मात्र, इथूनच त्यांनी विधानसभेसाठी निवडणुकीचा अर्ज भरला. या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाला आणि गुट्टेंनी या निवडणुकीत पैशाचा पाऊस पाडल्याचा आरोप विरोधकांनी केला. अनेकजण पैसे घेताना कॅमेऱ्यातही कैद झाले, पण हे पैसे गुट्टेंनीच दिले हे सिद्ध होऊ शकलं नाही. 24 ऑक्टोबरला निकाल लागला, ज्यात 80 हजार 605 विक्रमी मतं मिळवत गुट्टे विजयी झाले. शिवसेनेच्या विशाल कदम यांचा त्यांनी 18 हजार 896 मतांनी पराभव केला. कोठडीत राहून निवडणूक जिंकल्यानं गुट्टे चांगलेच चर्चेत राहिले.

हा घोटाळा कसा झाला?

रत्नाकर गुट्टेंनी सरकारची योजना आणि बँकांमधील एक कमकुवत बाजू शोधली, ही बाजू होती पीक कर्जाची. बँका शेतकऱ्यांना कमी व्याजदरानं पीककर्ज देतात, आणि हे कर्ज सहज उपलब्ध होतं, हे गुट्टेंनी हेरलं, गुट्टे हे गंगाखेड साखर कारखान्याचा संचालक आहेत. आणि त्यामुळेच त्यांनी कारखान्याचे सभासद असलेल्या तब्बल 27 हजार शेतकऱ्यांच्या नावे पीककर्ज उचलल्याचा आरोप आहे. शिवाय बोगस कंपन्यांच्या नावेही कर्ज उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या कर्जाची रक्कम ऐकली तर डोळे पांढरे होतील, ही रक्कम आहे तब्बल 5 हजार 500 कोटी

बनावट कंपन्या, बनावट व्यवहार आणि हजारो कोटींचा घोटाळा

रत्नाकर गुट्टे आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे तब्बल 22 नोंदणीकृत बनावट कंपन्या बनवल्याचा आरोप आहे, ज्यांना आपण शेल कंपन्या म्हणतो. या कंपन्या फक्त कागदावरच अस्तित्त्वात होत्या. या कंपन्यांचे व्यवहार शून्य रुपयांचे असूनही हजारो कोटींची उलाढाल दाखवण्यात आली. आणि याच माध्यमातून त्यानं 185 बँका आणि पतसंस्थांकडून शेकडो कोटींची कर्ज घेतल्याचा आरोप आहे. शिवाय गंगाखेड शुगर्सद्वारे त्यांनी हार्वेस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट ही स्कीम चालवली. ज्यामध्ये 2015 मध्ये त्यानं 600 हून अधिक शेतकऱ्यांच्या नावानं कर्ज उचलत वाहनांची खरेदी केली. ही सगळी वाहनं त्यांनी कारखान्यावर कामाला लावल्याचाही आरोप करण्यात आला होता. शेल कंपन्यांना मिळालेलं कर्ज, दुसऱ्या कंपनीला कर्ज म्हणून द्यायचं आणि व्यवहार सुरु करायचे ही मोडस ऑपरेंडी होती असा आरोप विरोधक करतात. आंध्रा बँक, यूको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक, आणि रत्नाकर बँकेसह अनेक पतसंस्थांना गंडवल्याचा आरोप आहे.

गुट्टेंच्या कंपन्या आणि त्यांनं घेतलेली कर्ज (भांडवल/ कर्ज कोटींमध्ये)

(Who is Ratnakar Gutte Special Report on property and scams)

रत्नाकर गुट्टेंसोबतच त्यांच्या मुलांवरही  घोटाळ्याचे आरोप

रत्नाकर गुट्टेंलना 2 मुलं आहेत, पहिला सुनील आणि दुसरा विजय. या दोघांवरही घोटाळ्याचे आरोप झाले आहे, याबाबतची माहिती तुम्ही इंटरनेटवर शोधली की लगेच मिळून जाईल. सुरुवात सुनीलपासून करुया…गुट्टेंचा मुलगा सुनील याला 12 नोव्हेंबर 2020 ला बनावट इनपूट टॅक्स क्रेडीटप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. सुनीलनं ज्या कंपन्यांमध्ये काहीच व्यवहार नाही, त्या कंपन्यांमध्ये व्यवहार दाखवत जीएसटी क्लेम केला. आणि सरकारला कोट्यवधींचा गंडा घातला. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या बळावर, 520 कोटी रुपये आयटीसी मिळवल्याचा आरोप सुनील यांच्यावर आहे. तब्बल सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे बनावट इनव्हाॅईस बनविण्यात आले आहेत. एवढंच नाही तर  कंपन्यांची उलाढाल जास्त दाखविण्यासाठी या बोगस बिलांचा वापर करण्यात आला. उलाढाल जास्त वाढवून दाखविल्याने कर्जाची मर्यादा आणि बॅेकेकडूनही जादा कर्ज मिळण्यासाठी त्याचा उपयोग झाला. या साऱ्या प्रकारात सुनील हायटेक एक प्रमुख असल्याचे डीजीसीआयने म्हटले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांची चित्रपटातून खिल्ली उडवणारा दुसरा मुलगा विजय

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट जानेवारी 2020 ला प्रदर्शित झाला. ज्यामध्ये मनमोहन सिंहांच्या नेतृत्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यावरुन देशभर वातावरण तापलं, त्या चित्रपटाचा दिग्दर्शक होता, विजय रत्नाकर गुट्टे. ज्यानं मनमोहन सिंहांवर अनेक प्रश्न उपस्थित केले, मात्र, त्याच विजयचे हात घोटाळ्यात बरबटले आहेत. गुट्टेंच्या या मुलावर भारतासह ब्रिटनमध्येही करचोरीचा आरोप आहे. आधी ज्या कंपनीचा उल्लेख झाला, ती व्हीआरजी डिजीटल कॉर्पोरेशन विजय सांभाळतो. याच कंपनीच्या माध्यमातून त्यानं हा गैरव्यवहार केला. 2018 ला विजय गुट्टेला मुंबईतून जीएसटी इंटेलिजन्सनं अटक केली. त्याच्यावर भारतात 34 कोटींचा जीएसटी घोटाळ्याचा आरोप आहे. जुलै 2017 पासून ते खोट्या बिलांच्या आधारे जीएसटीचा क्लेम घेत असल्याचं समोर आलं आहे.

भारतासोबत विजय गुट्टेनं ब्रिटन सरकारलाही फसवलं?

भारतासोबत ब्रिटनमध्येही करचोरी केल्याचा आरोप विजय गुट्टेवर आहे. ब्रिटनमध्ये त्याने करात सवलत मिळवण्याचा अर्ज केला, ज्यामध्ये त्यानं अनेक खोटी कागदपत्र देत कर सवलत मिळवल्याचं सांगण्यात आलंय.  ब्रिटीश फिल्म इंस्टिट्यूट ही ब्रिटनमधली चित्रपटांना प्रमाणपत्र देणारी संस्था आहे. या संस्थेकडून ब्रिटनमध्ये जे चित्रपट बनतात, त्यांना कर सवलत मिळते. कर सवलत मिळवण्यासाठी चित्रपटाच्या एकूण खर्चाच्या 10 टक्के खर्च ब्रिटनमध्ये करणं बंधनकारक आहे. या गोष्टीचा विजयनं फायदा घेतला, आणि चित्रपटासाठीचा बहुतांश खर्च हा ब्रिटनमध्येच झाल्याचं दाखवलं, प्रत्यक्षात त्यानं तिथं अत्यंत कमी खर्च केला. खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यानं ब्रिटन सरकारकडून तब्बल 25 टक्क्यांपर्यंत करसवलत मिळवल्याचा आरोप आहे. सध्या विजय गुट्टेचीही चौकशी सुरु आहे.

गुट्टेंची संपत्ती पाहून डोळे फिरतील!

रत्नाकर गुट्टेंच्या संपत्तीबद्दल अनेक अंदाज वर्तवले जातात, मात्र, त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कागदोपत्री संपत्ती दाखवलीय तिच्यावर आपण नजर टाकू

—————————————————————————————————————–

गुट्टेकडे 82 कोटी 5 लाख रुपयांची जंगम मालमत्ता

पत्नी सुदामती यांच्याकडे 49 कोटी 18 लाख 4 हजार 496 रुपयांची जंगम मालमत्ता

गुट्टे पती-पत्नीकडील जंगम मालमत्तेचा आकडा 100 कोटींहून अधिक

गुट्टेच्या नावे 9 कोटी 59 लाख 75 हजारांच्या स्थावर मालमत्ता

पत्नीच्या नावे 8 कोटी 13 लाखांची स्थावर मालमत्ता

गुट्टेंकडे 149 कोटी 24 लाख 48 हजार 761 मालमत्ता आहेत.

आत्ताच रत्नाकर गुट्टेंवर कारवाई का?

रत्नाकर गुट्टेंवर इतके आरोप आहे, याआधीही त्यांचं नाव चर्चेत होतं, मग त्यांच्यावर आत्ताच कारवाई का? असा प्रश्न पडतो. याचा काही राजकीय संबंध तर नाही ना? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. रत्नाकर गुट्टे सध्या ज्या पक्षात आहे, तो रासप पुढच्या काळात भाजपचा हात सोडून, महाविकास आघाडीला साथ देण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी रत्नाकर गुट्टे आणि महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. एवढंच नाही, तर अजित पवारांच्या भेटीनंतर ते थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहचले. त्यामुळं या चर्चांना अधिक बळ मिळालं. हेच पाहता भाजप महाराष्ट्रातील त्यांचा एक मित्रपक्ष गमावू शकते. त्यामुळं ही कारवाई आणि रत्नाकर गुट्टेंचं महाविकास आघाडीकडे जाणं यात परस्पर संबंध असू शकतो असं राजकीय विश्लेषक सांगतात.

घोटाळ्यांच्या भरवशावर रत्नाकर गुट्टेंनी कोट्यवधींची माया जमा केली असा आरोप विरोधक करतात. त्याबाबत धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत चौकशीची मागणीही केली होती. ईडीनं सध्या चौकशीअंती संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरु केली आहे. त्यामुळं पुढच्या काळात ईडीच्या कारवाईत अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

रत्नाकर गुट्टेंची तब्बल 255 कोटींची संपत्ती जप्त, गंगाखेडच्या आमदाराला ED चा मोठा दणका

(Who is Ratnakar Gutte Special Report on property and scams)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.